आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्या अडचणीत; \'मोटार रेसिंग\'मध्ये सहभागी होतील की ईडीसमोर हजर?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेले उद्योगपती विजय माल्ल्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉडरिंगप्रकरणी माल्यांना ईडीने 18 मार्चला चौकशीसाठी हजर राहाण्यासाठी समन्स बजावला आहे. मात्र, या दिवशी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन फॉर्मूला वन ग्रांड प्री रेसिंगचा 'प्रॅक्टिस डे' आहे. माल्या ब्रिटनच्या फोर्स इंडिया टीमचे सहमालक आहे. त्यामुळे माल्या मोटार रेसिंगच्या प्रॅक्टिसमध्ये सहभागी होतात, की ईडीसमोर हजर होतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, बॅंकांसोबतच आता सरकार देखील माल्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. यात माल्यांच्या पर्सनल एअरबस ACJ 319 चा देखील समावेश आहे. माल्याच्या पर्सनल जेटची विक्री करून सरकार 812 कोटी रुपयांचा सर्व्हिस टॅक्स व दंडाची रक्कम वसूल करणार आहे. दुसरीकडे, माल्या सक्तवसुली संचालनालयासमोर(ईडी) चौकशीसाठी हजर न झाल्यास त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

इंटरव्ह्युबाबत माल्यांचा युटर्न, 'न्यूजपेपर'ने जारी केला ईमेल
- विजय माल्यांनी रविवारी 'द संडे गार्जियन'ला (The Sunday Guardian) इंटरव्ह्यू दिल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी फेटाळले.
- 'protonmail account वरुन इंटरव्ह्यू दिल्याचा दावा 'संडे गार्जियन'ने केल्याचे पाहून मी चकीत झालो. या मेलविषयी तर आपण कधी ऐकलेलेच नसल्याचे माल्यांनी मंगळवारी केलेल्या ट्‍वीटमध्ये म्हटले आहे.
- यानंतर 'द संडे गार्जियन'ने माल्यांशी मेलच्या माध्यमातून झालेल्या संभाषणाचे डिटेल्स जारी केले आहे.
- दरम्यान, मेलद्वारा दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आपण मित्रासोबत पर्सनल टूरवर असल्याचे माल्यांनी मेलद्वारा दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते.

किंगफिशरचे पाच छोटे एटीआर विक्रीचीही तयारी...
- एअरबसशिवाय सरकारने किंगफिशर एअरलाइन्सचे पाच छोटे एटीआर व तीन हेलिकॉप्टर्सही विक्रीची तयारी सरकारने केली आहे.
- सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटने आधीच किंगफीशर एअरलाइन्स कंपनीवर जप्तीचे कारवाई केली आहे.
- किंगफिशर एअरलाइन्स 2012 मध्ये बंद झाले आहे. माल्यांनी देशातील राष्ट्रीय व खासगी बॅंकाचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये बुडवले आहे.

सरकार लिलावातून किती वसूल करणार?
- एक स्टँडर्ड एअरबस A319 ची किंमत 600 कोटी रुपये आहे.
- सर्व्हिस टॅक्सच्या रुपात कंपनीने 812 कोटी रुपये थकवले आहे.
- कंपनीने 32 कोटी रुपये प्रवाशांकडून कमावले. मात्र, सर्व्हिस टॅक्स भरला नाही.
- दरम्यान, मागील वर्षी माल्यांना अटक करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती.
- ही मागर्णी मुंबई कोर्टाने फेटाळली होती.

यामुळे माल्यांचा पासपोर्ट होऊ शकतो रद्द
- ईडीने माल्यांना 18 मार्चला चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावला आहे.
- मनी लॉडरिंगप्रकरणी माल्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. माल्या चौकशीसाठी हजर न झाल्यास त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर्ज बुडवे विजय माल्या यांच्यावरुन काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी अरुण जेटलींवर आरोप केला. ते म्हणाले, 'देश सोडण्यापूर्वी माल्याने जेटलींची भेट घेतली होती का?' माल्यावरुन सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसने पाच प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्लॅकमनी आणण्याऐवजी मोदी-माल्याला गेट-वे देत आहे मोदी सरकार
- सूरजेवाला म्हणाले, 'मोदी सरकारने निवडणुकी दरम्यान भारताचे विदेशातील काळेधन परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप तसे होताना दिसलेले नाही.'
- 'त्या उलट ललित मोदी आणि विजय माल्यासारख्या लोकांना विदेशात पळून जाण्यासाठी गेट-वे तयार करुन दिला जात आहे.'

काँग्रेसचे मोदी सरकारला 5 प्रश्न
1- माल्याला भारत सरकारला सोपवण्यासाठी ब्रिटन सरकारवर दबाव टाकला जाणार का ? सरकार जनतेचे 9 हजार कोटी रुपये परत मिळवणार का ?
2- माल्याने 1 मार्चला अर्थमंत्री अरुण जेटली आणि अर्थसचिवांची भेट घेतली होती. जेटलींनी त्यांच्या या बैठकीबद्दल मोदींना माहिती दिली होती का, ते संसदेला त्याबद्दल सांगतिल का ?
3- माल्यांना पकडण्यासाठी सीबीआयने नोटीस जारी केली होती, ती सीबीआयने फक्त माहिती देण्यापर्यंत का सीमित केली ? असे करण्यामागे काय उद्देश होता ?
4- सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माल्याला हजर राहाण्यासाठी समन्स बजावला होता. कोर्टानेही अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यानंतरही माल्या देशबाहेर कसे काय गेले ?
5- डियाजियो (यूनायटेड स्पिरिटचे मालक) यांनी माल्यासोबत 515 कोटींचा सौदा केला होता. कंपनीच्या संचालक मंडळापासून दूर होण्यासाठी त्यांना ही रक्कम देण्यात आली होती. त्यातील 40 मिलियन डॉलर माल्यांच्या अकाऊंटला जमा झाले आहेत. भारत सरकार ते पैसे कसे परत मिळवणार?

पुढील स्लाइडवर वाचा, माल्या म्हणाले- ना पळून गेलो, ना परत येण्याची घाई; मित्रासोबत पर्सनल टूरवर...