आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण मुजुमदार फार्मातील दुसरी शक्तिशाली व्यक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- बायोकॉनच्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ या औषध जगतातील दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली व्यक्ती बनल्या आहेत. इंग्लंडमधील विख्यात मासिक द मेडिसिन मेकरने १०० व्यक्तींच्या सुचीत किरण यांना दुसरे स्थान दिले आहे.
जगातील अनेक बड्या कंपन्यांचे सीईओ, औषध निर्माण क्षेत्रातील व्यक्ती आणि नोबेल पुरस्कार विजेत्यांचा या सुचीत समावेश आहे. विशेष म्हणजे, भारतातील केवळ किरण मुजुमदार यांचाच या यादीत समावेश आहे. उत्तर अमेरिका, युरोपातील व्यावसायिकांनी या यादीत मोठ्या प्रमाणात स्थान पटकावले आहे. ही नामांकन यादी वाचकांच्या पसंतीनुसार विशेषज्ञ तयार करतात.

अनेक पुरस्कार खात्यात
६२ वर्षांच्या किरण मुजुमदार बायोकॉनच्या सीएमडी आहेत. त्या आयआयएम बंगळुरूच्या विद्यमान चेअरपर्सनही आहेत. विज्ञान आणि गणित विषयातील त्यांच्या योदगानाबद्दल मागील वर्षी त्यांना ओथमर गोल्ड मेडल मिळाले होते. फायनान्शियल टाइम्सने त्यांना टॉप-५० बिझनेस वुमनच्या यादीत स्थान दिले होते. फोर्ब्जने २०१४ मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांना ९२ वा क्रमांक दिला होता.

बायोकॉन प्रतिष्ठित कंपनी
औषध संशोधनात कंपनीचे विशेष नाव आहे. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ८,६०० कोटी रुपये आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये २२४१ कोटी रुपयांच्या महसुलात कंपनीने ३६१ कोटींचा नफा कमावला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये कंपनीचा नफा ३३० कोटी रुपये होता.

औषध जगतातील ५ प्रमुख व्यक्ती
१ अॅन्थनी फॉची : संचालक, एनआयएआयडी, अमेरिका
२. किरण मुजुमदार शॉ : सीएमडी, बायोकॉन
३. अँड्र्यू विट्टी : सीईओ, ग्लॅक्सोस्मिथलाइन
४. आर्थर लेक्सिन : सीईओ, कॅलिको
५. हीदर ब्रेश्च : सीईओ, माइलान
बातम्या आणखी आहेत...