आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मिनिटांत जाणून घ्या अर्थसंकल्पातील सर्व बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बजेट कसे अाहे?
एकच  वैशिष्ट्य म्हणजे- काहीच वाईट निर्णय नाही. मात्र तरतुदी इतक्या छाेट्या-  छाेट्या की काेणत्याच वर्गाला, क्षेत्राला विशेष लाभ नाही.

प्राप्तिकरात तर ५० % सूट दिलीय?
किरकाेळ बचत हाेईल. दुर्दैव हे की तीन ते ५० लाखांपर्यंत एकसारखीच (१२,८७५ रु.) सवलत.

नाेटाबंदीत सहकार्याचे काैतुक केले?
निश्चितच. परंतु त्रासाच्या तुलनेत लाेकांना ठाेस काही मिळाले नाही.

सेवाकर वाढीचा बाेजा टाकलेला नाही?
- असे नाही. १५ सप्टेंबरपर्यंत जीएसटी लागू करणे अनिवार्यच अाहे. त्यात किमान १८ % सेवा कर लागणारच. सप्टेंबरपासून महागाई अाहेच.

उद्योग क्षेत्रासाठी तर बरेच काही दिलेय?
- दाेन उपाय चांगले अाहेत. पहिला- ५० लाखांपर्यंत उलाढालीच्या कंपन्यांचा कर ५% घटवला. खरे तर अाधीची वाढच चुकीची हाेती. कारण ५०० काेटींपर्यंतची कंपनीही तितकाच कर देत हाेती. दुसरा फायदा- २ काेटी उलाढालीवरील करदात्यांना २ % सवलत दिली. २० काेटींपर्यंतची कंपनी अापले काम २-२ काेटीत विभागून या निर्णयाचा लाभ घेऊ शकेल.

डिजिटल इकाॅनाॅमीसाठी काय विशेष?
- विशेष नाही. जेवढी चर्चा झाली त्या तुलनेत अत्यल्पच तरतूद. भीम अॅप लाेकप्रिय झाले तरी कॅशबॅकचा फायदा मात्र व्यापाऱ्यांना. युजरना मात्र डावलले.

१० लाख पीअाेएस मशीन्सचे काय झाले?
- का लावतील लाेक? अाधारची मशीन त्यापेक्षा छाेटी व स्वस्त अाहे. डिजिटल पेमेंटचे व्यवहार वाढण्याची अपेक्षा असताना बजेटमध्ये सरकारी शुल्कांबाबत मात्र केवळ विचारार्थ असा उल्लेख केलेला अाहे.

राजकीय पक्षांना तर दणका दिलाय?
- धाडसी निर्णय अाहे. स्वच्छ नेता अभियानाचा विचार चांगला. मात्र अजूनही २ हजारापर्यंतचा पर्याय खुलाच ठेवलाय. ६० ते ९२ % निधी सध्या बेनामीच येताेय. अाता २-२ हजारांचे लाखाे देणगीदार दाखवतील.

युवकांसाठी काय दिले?
- काैशल्य वाढविण्याचे भरपूर उपाय.

नाेकऱ्यांसाठी काय तरतूद?
- तीन लाख काेटींहून अधिक निधी गावांत खर्च हाेईल. त्यातून छाेट्या नाेकऱ्या निर्माण हाेतील. बाकी मनरेगात. परंतु क्वालिटी जाॅबसाठी ठाेस काहीच नाही.

महिलांसाठी विशेष काही नाही?
-ग्रामीण असाे वा शहरी, महिलांसाठी ठाेस काहीच नाही. केवळ याेजनांचा उल्लेख केलाय.

अाराेग्यासाठी काय दिले?
- क्षयराेग, कुष्ठराेग निर्मूलनासाठी टार्गेट दिले अाहे. पाेलिअाे मुक्तीनंतर हे माेठे पाऊल असेल.

एकूणच बजेटचा अन्वयार्थ काय?
- हे बजेट काही ‘बिग अायडिया’ किंवा ‘बिग बँग रिफाॅर्म’ नाहीच. फक्त पंतप्रधान नरेंद्र माेदीच ‘बिग अायडिया’ जाहीर करतील. चारही बजेट असेच राहिलेत.
बातम्या आणखी आहेत...