आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅलरी स्लिप अत्यंत महत्त्वाची; जाणून घ्या लपलेली खास माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरदारांना प्रत्येक महिन्याला कामाच्या मोबदल्यात सॅलरी मिळत असते. एचआर डिपार्टमेंटकडून त्यांना सॅलरी स्लिप देखील मिळते. परंतु, बहुतांश लोक सॅलरी स्लिप पाहातही नाहीत. सॅलरी स्लिममध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबी असतात. त्यापासून अनेकजण अनभिज्ञ असतात. नोकरी बदलताना किंवा पगार वाढीच्या (इंक्रीमेंट) वेळी सॅलरी स्लिमची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

दुसरी नोकरी शोधताना सॅलरी स्लिपपाहून वाढीव पॅकेज मागितले जाते. तसेच कंपनी देखील तुमची सॅलरी स्लिप पाहूनच पॅकेज ऑफर करत असते. सॅलरी स्लिपमध्ये कोणकोणत्या बाबी असतात, या संदर्भात आज आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे.

अशी बनते सॅलरी स्लिप
सॅलरी स्लिपमध्ये दोन गोष्‍टी महत्त्वाच्या असतात. 1) इनहँड सॅलरी व 2) डिडक्शन पार्ट
दोन्ही गोष्‍टी एकत्र करून मासिक सीटीसी अर्थात (कॉस्ट टू कंपनी) बनत असते. याचा अर्थ असा की महिन्याकाठी कंपनी आपल्यावर किती खर्च करत आहे, असा घेतला जातो. स्लिपमध्ये सर्व भत्त्याचा समावेश असतो.

इनहँड सॅलरीमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या...
1. बेसिक सॅलरी
सॅ‍लरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरी हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बेसिक सॅलरीही एकूण सॅलरीच्या 35-40 टक्के असते. आपली बेसिक सॅलरी जितकी जास्त त्यावर आपल्याला टॅक्स (कर) भरावा लागतो. बेसिग सॅलरी ही 100 टक्के टॅक्सेबल आहे.

2. हाऊस रेंट अलाउंस (एचआरए)
एचआरए हा बेसिक सॅलरीच्या 50 टक्के असतो. कर्मचारी मेट्रो सिटीमध्ये अथवा टियर टू, टियर थ्री शहरात राहात असेल तर एचआरए बेसिक सॅलरीच्या 40 टक्के असतो. एचआरएमध्ये कर्मचार्‍याला टॅक्समध्ये सूरू मिळते.

3. कन्‍वेअन्स अलाउंस
कन्वेअन्स अलाउंस कर्मचार्‍याला ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस ये-जा करण्‍यासाठी असतो. ही रक्कम कंपनी जॉब प्रोफाइलनुसार निर्धारित करत असते. सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍याचा कन्‍वेअन्स अलाउंस जास्त असतो. ही रक्कम इनहॅंड सॅलरीमध्ये दिली जाते.

सॅलरीत 1600 रुपयांपर्यंत कन्‍वेअन्स अलाउंस मिळत असेल तर त्यावर टॅक्स आकारला जात नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लीव्ह, मेडिकल व स्पेशल अनाउन्सविषयी...
(टीप: छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)