(फोटोः मुकेश आणि नीता अंबानीसोबत अनंत अंबानी)
देशातील सर्वात धनाढ्य उद्योगपतीच्या मुलांचे पालनपोषण कसे होते. ही मंडळी
आपल्या मुलांना कसे मोठे करतात, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. या पॅकेजमधून आज आम्ही वाचकांना रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलांचे पालनपोषण कसे केले, याविषयी माहिती देत आहोत.
मुकेश अंबानी सध्या अनेक मुद्यांवरून चर्चेत आहेत. मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. अंबानींनी नुकतेच सन फार्माचे मालक दिलीप संघवी यांना मागे टाकत देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
मुकेश अंबानी हे एक यशस्वी उद्योगपतीसोबत योग्य पती आणि पिता असल्याचे पत्नी नीता अंबानींनी म्हटले आहे. मुकेश आणि नीता आपल्या तीन मुलांचे योग्यप्रकारे पालनपोषण केले आहे. शिक्षणासोबत त्यांना नैतिक मुल्यांची शिकवण दिली आहे.
मुलांना पॉकेटमनीत फक्त पाच रुपये देत असल्याचे खुद्द नीता अंबानी यांनी एका वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये कबूल केले आहे. मुलगा आकाश, अनंत आणि मुलगी ईशाला शाळेत पाठवताना नीता अंबानी त्यांना पॉकेटमनीत फक्त पाच रुपये देत असत. विद्यार्थीदशेत आपल्या मुलांना त्यांना पैशापासून नेहमी दूर ठेवले. मुलांच्या वर्गातील मुळे नेहमी त्यांची थट्टाही उडवत असत. परंतु, नीता यांनी मुलांच्या मनावर कधी या गोष्ठीचा विपरीत परिणाम होऊ दिला नाही.
एकेदिवशी अनंतच्या हातात पाच रुपये पाहून त्याचा एक क्लासमेट म्हणाला, ‘तु अंबानी आहे की भिखारी...।’ अनंतने घरी आल्यानंतर आई-वडीलांना ही गोष्ट सांगितली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, मुकेश आणि नीता मुलांचे असे केले पालनपोषण...