आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात वेळ साधा, चांगला फायदा मिळवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही बाबीवर काळ हे उत्तम औषध आहे हे त्रिकालाबाधित सत्य शेअर बाजारासाठीही लागू पडते. शेअर बाजारातील काही अच्छे दिवस गमावणे म्हणजे चांगल्या परताव्याच्या संधी गमावण्यासारखेच आहे. बाजारात वेळ साधण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जरी खरे असले तरी ही योग्य वेळ कोणती ? व तिची वाट पाहण्यात अनेक संधी हातातून निसटतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळी गुंतवणूक करता याला जास्त महत्त्व न देता, गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे संधीच्या प्रतीक्षेत गुंतवणूकच न करणे जास्त घातक आहे. त्यामुळे बाजारात वेळ साधा. वेळेसाठी बाजारात घुसण्याचे टाळू नका.
योग्य संधीच्या शोधात गुंतवणूक न करता काठावर बसून राहणे यासारखा मूर्खपणा नाही. कारण बऱ्याच वेळा शेअर बाजारात खराब स्थिती असताना केलेली गुंतवणूकही चांगला परतावा मिळवून देते, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक टाळणे महागात पडू शकते.

काळाचा सापळा असा भेदा
-गुंतवणुकीबाबत एक सुनियोजित व सुटसुटीत असे धाेरण आखा. त्यानुसार नियोजन करा. त्यामुळे बाजारातील अस्थैर्यावर मात करता येईल.

-गुंतवणुकीतील इच्छित परताव्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (सिप)चा आधार घ्या. सिप अशी योजना आहे की ज्यात गुंतवणूकदार एक ठरावीक रक्कम एका ठरावीक कालावधीच्या अंतराने गुंतवत असतो. यात कमी किमतीला जास्त युनिट्स किंवा समभाग खरेदी होत असतात किंवा जेव्हा शेअर्स तेजीत असतो तेव्हा तेवढ्याच रकमेत कमी शेअर्स किंवा युनिट्स पदरात पडत असतात.
लवकर सुरुवात, उत्तम परतावा
सिपमुळे कसा फायदा होतो, यासाठी एक उदाहरण घेऊया. यात वेळेचे महत्त्व किती आहे हेही यावरून लक्षात येईल. समजा “अ’ ने ३५ व्या वर्षी वर्षाकाठी एक लाख रुपयांचे सिप सुरू केले आणि “ब’ने त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षी तेवढ्याच रकमचे सिप सुरू केले. तर कसा फायदा होतो ते लक्षात घ्या.

सिपचे महत्त्व
-रुपयाच्या मूल्याचे सरासरी तत्त्व अर्थात प्रिन्सिपल ऑफ रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग यावर सिप कार्यरत असते. {यात ठरावीक मुदतीनंतर शिस्तबद्ध गुंतवणूक होत असते. बाजारात अस्थिरता असताना सिप उत्तमरीत्या काम साधते. {बाजार घसरला की पदरात जास्त युनिट्स पडतात, तर तेजी आल्यास कमी समभाग मिळतात. {सिप खिशाला परवडते.
चक्रवाढ व्याजाची किमया
-पद्धतशीर गुंतवणूक योजनेत चक्रवाढ व्याज मोठी िकमया साधते. आपल्या उदाहरणात चक्रवाढ व्याजातील केवळ दोन टक्क्यांचा फरकही “ब’च्या निवृत्तीच्या वेळी १.१२ कोटी रु जास्त रक्कम “ब’च्या खात्यात जमा करतो.
लेखक नाशिक येथील गुंतवणूक तज्ज्ञ आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा मिळवतायेयील फायदा...