आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Coca Colaमध्ये \'कोकेन\'? आजही तिजोरी बंद आहे सीक्रेट फॉर्म्युला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सॉफ्ट ड्रिंक निर्माता कंपनी 'कोका कोला'ला मोठा रंजक इतिहास आहे. जॉर्जियामधील अटलांटामधून सुरु झालेल्या या कंपनीचा कारोभार आज जगभरात पसरला आहे. भारतात देखील 'कोका कोला'ला मोठे मार्केट लाभले आहे. 'कोका कोला'ने जगभरातील सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये आपल्या खास टेस्‍टच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र, 'कोका कोला'च्या खास टेस्ट मागे रहस्य लपले आहे, त्यावरून अद्याप पडदा उठलेला नाही.
तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, 'कोका कोला'चा फॉर्म्युला सीक्रेट असून तो आजही एका तिजोरीत बंद आहे. या फॉर्म्युल्यावरून आजही वाद- प्रतिवाद होत असले तरी कंपनीने फॉर्म्युला सार्वजनिक केला नाही. विशेष म्हणजे सुरुवातील कोका कोलामध्ये कोकेन मिसळले जात होते, असा दावा देखील एका लेखकाने आपल्या पुस्तकात केला आहे.
फक्त दोन व्यक्तिंना माहीत आहे 'फॉर्म्युला'
'कोका कोला'च्या सीक्रेट फॉर्म्युल्याविषयी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी अजूनही अनभिज्ञच आहेत. कंपनीच्या फक्त दोनच एक्झिक्युटिव्हला या फॉर्म्युल्याचे रहस्य माहीत आहे. विशेष म्हणजे या दोघांना कंपनी कधी एकत्र येऊ देत नाही. कंपनीच्या स्ट्रॅटजीनुसार दोघे प्रवास देखील वेगवेगळा करतात. 'फॉर्म्युला आपल्या जागेवर सुरक्षित असून तो कधीही सार्वजनिक होऊ शकत नसल्याचे कंपनीने 2011 मध्येच स्पष्ट केले होते.

येथे ठेवला आहे फॉर्म्युला
'कोका कोला'ने आतापर्यंत कंपनीच्या एकाही अधिकार्‍यासमोर फॉर्म्युला डिस्‍क्‍लोज केला नाही. अटलांटामधील सन ट्रस्ट बॅंकमध्ये या फॉर्म्युल्याची ओरिजनल कॉपी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सन ट्रस्ट बॅंकेने फॉर्म्युला कधीही डिस्क्लोज करू नये, यासाठी 'कोका कोला'मध्ये बॅंकेला 48.3 मिलियन शेअर देण्यात आले आहे. सन ट्रस्टच्या अधिकार्‍यांना कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कधी बनला 'कोका कोला'चा फॉर्म्युला, कोकेनही मिसळले जायचे...
(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहेत.)