आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय माल्यांनी या महिलेसोबत सोडला देश; काय आहे दोघांमधील \'रिलेशन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील 17 बॅंकांना सुमारे 9,000 कोटी रुपयांना चूना लावणारे मद्यसम्राट विजय माल्यांनी 2 मार्चला ब्रिटनला पलायन केले. माल्या ऐकटे देश सोडून गेले नाही, तर त्यांच्यासोबत एक म‍हिला असल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पिंकी ललवाणी हिने माल्यांसोबत ब्रिटनमध्ये पलायन केले आहे. पिंकी ही माल्यांच्या मर्जीत असणार्‍यांपैकी एक आहे. माल्यांच्या 'गुड टाइम्स'मध्येही ती सोबत होती व आज पडत्या काळातही त्यांच्या सोबतच आहे.

विमानात माल्यांच्या शेजारच्या सीटवर बसली होती पिंकी...
मिळालेल्या माहितीनुसार, विजय माल्या विदेशात जाताना जेट एअरवेजचे विमान 9W-122 च्या सीट क्रमांक डी 1 वर बसले होते. विजय माल्याच्या शेजारच्या सीटवर पिंकी ललवाणी बसली होती. मागील अनेक वर्षांपासून ‍पिंकी माल्यांसोबत आहे.

पिंकी ललवाणी माल्यांची तिसरी पत्नी?
विजय माल्या यांनी पिंकी ललवाणीसोबत गुपचूप विवाह केल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. माल्यांच्या प्रत्येक सुख- दु:खात पिंकी सोबत असते.

पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे पिंकी ललवाणी...