आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Mangalam And Neerja Birla Special Story In Marathi

22 व्या वयात विवाह करून उच्चशिक्षणासाठी लंडनला गेले हे अब्जाधिश दाम्पत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी नीरजासोबत कुमार मंगलम बिर्ला - Divya Marathi
पत्नी नीरजासोबत कुमार मंगलम बिर्ला
जोधपूर- कुमार मंगलम बिर्ला व त्यांची पत्नी नीरजा या दिवसात उम्मेद भवनात होत असलेल्या एका समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जोधपूरला पोहोचले आहेत. उदयपूरमध्ये एका फॅमिली फंक्शनमध्येही हे दाम्पत्य सहभागी होणार आहे. कुमार मंगलम हे 2.58 लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. वयाच्या 22 वर्षी कुमार यांचा विवाह झाला.

28 व्या वयातच बिर्ला ट्रस्टची जबाबदारी स्विकारली...
22 व्या वयात कुमार यांचा नीरजा यांच्यासोबत विवाह झाला. नीरजा तेव्हा 18 वर्षांच्या होत्या. हे अरेंज मॅरेज आहे. विवाहानंतर एकानंतर नवदाम्पत्य लंडनला पुढील शिक्षणासाठी रवाना झाले. लंडन बिझनेस स्कूलमधून कुमार यांनी एमबीए केले. नंतर 28 व्या वयातच त्यांनी आदित्य बिर्ला ट्रस्टची जबाबदारी स्विकारली. सध्या ते कंपनीचे चेअरमन आहेत. कुमार व नीरजा यांना तीन मुले अनन्याश्री, आर्यमन विक्रम व अद्वैतेषा.

कोण आहेत नीरजा?
नीरजा यांचे बालपण मध्य प्रदेशातील इंदूर येथील कासलीवाल कुटुंबात गेले. नीरजा या बिझनेसमन शंभू कासलीवाल यांच्या कन्या आहेत. त्यांच्या नावावरून शंभू कासलीवाल यांनी बंगल्याचे नाव 'नीरजा व्हिला' असे ठेवले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, कुमार मंगलम बिर्ला व नीरजा बिर्ला यांचे फोटोज...