आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कामासाठी अब्जाधीश कन्येने सोडला कोट्यवधींचा बिझनेस, केले हटके!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉर्पोरेट घराण्याची एक परंपरा असते, ती म्हणजे घरातील मुलेच आपल्या वडिलोपार्जित बिझनेस करतात. त्याचा विस्तार करतात. पण, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या हिने हा ट्रेंड बदलला आहे. तिने आपला स्वतंत्र मार्ग निवडला आहे. तिने हा निर्णय विद्यार्थिदशेत असतानाच घेतला होता.

वडिलांचा बिझनेस सोडून सध्या काय करतेय अनन्या....
- 'फोर्ब्स' मॅगझिननुसार, अनन्याचे वडील कुमार मंगलम बिर्ला देशातील आठवे सर्वात श्रींमत व्यक्ती आहे. त्यांची मालमत्ता 587 अब्ज रुपयांच्या घरात आहे.
- अनन्याने आपल्या कर्तुत्त्वाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. अनन्याने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्स आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.
- अनन्या हिने नुकतीच एक ई‑कॉमर्स कंपनी सुरु केली आहे.

3 वर्षांपूर्वी सुरु केली होती पहिली कंपनी...
- अनन्याने जवळपास 3 वर्षांपूर्वी 1 मार्च 2013 रोजी आपली पहिली कंपनी सुरु केली होती.
- ही कंपनी मायक्रोफायनान्स क्षेत्रात काम करते. ग्रामीण भागातील लोकांसाठीसाठी ही कंपनी काम करते. विशेष म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही कंपनी त्यांना अर्थ साहाय्य करते.
- अनन्याने याच वर्षी 'क्यूरोकार्ट डॉट कॉम' ही ई-कॉमर्स वेबसाइट सुरु केली आहे.
- आशिया आणि यूरोपमधील 9 देशांमध्ये ही वेबसाइट सर्व्हिस देते.
- अनन्याच्या 'स्वतंत्र' कंपनीचे काम आज दोन राज्यात चालते. कंपनीच्या 18 ब्रॅंच आहेत. त्यात 100 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

पुढील स्लाइडवर वाचा, अनन्याला कशी सुचली बिझनेसची आयडीया... आणि पाहा तिचे निवडक फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...