आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kumar Mangalam Birla Set To Buy Bungalow Jatiya House At Mumbai For Rs 425 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील सर्वात मोठी डील, बिर्लांनी 425 कोटींमध्ये खरेदी केले \'जाटिया हाऊस\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मलबार हिल येथील 'जाटिया हाऊस' हा बंगला प्रसिद्ध उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी सुमारे 425 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. मुंबईतील घरांच्या विक्रीच्या इतिहासातील हा सर्वात महाग व्यवहार ठरला आहे. 1950 मध्ये हा दुमजली बंगला बांधण्यात आला होता.

30 हजार चौरस फुट जागेत असलेला 'जाटिया हाऊस' विकण्यासाठी जाटिया बंधू मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्यासह दोन बड्या उद्योजकही हा आलिशान बंगला खरेदी करण्‍यासाठी उत्सुकता दाखवल होती. मात्र, कुमार मंगलम बिर्ला यांनी बंगल्याला सुमारे 425 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. बंगल्यासाठी या रकमेपेक्षा जास्त किंमत न आल्याने अखेर हा बंगला कुमार मंगलम बिर्ला यांनी विकण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जाटिया हाऊस'च्या लिलावाची प्रक्रिया मागील आठवड्यात सुरु झाली होती. ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टन्ट जेएलएल इंडियाने या व्यवहारात मध्यस्थी केली. बंगल्यासाठी कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह चार जण स्पर्धेत होते.
कुमार मंगलम बिर्ला स्वत: या बंगल्यात राहाणार आहेत. तसेच बंगल्याचा पुनर्विकास करण्याचा बिर्ला यांचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

'जाटिया हाऊस'?
1950 मध्ये जाटिया हाऊस बांधण्यात आले होते. एमपी जाटिया ग्रुप ऑफ कंपनीजचे पद्ममजी पल्प आणि पेपर मिल्स लि.चे संचालक अरुण आणि श्याम जाटिया बंधु या बंगल्याचे मालक होते. जाटिया बंधू गेल्या दोन वर्षांपासून हा बंगला विकण्याचा प्रयत्न करत होते. मागील वर्षी बंगल्याच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव ऐनवेळी हा व्यवहार रद्द झाला होता.

जाटिया बंधुंनी का विकला बंगला?
जाटिया बंधु मागील चार दशकांपासून या बंगल्यात राहात आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची देखरेख करण्‍यासाठी जाटिया बंधुंना मोठ्या अडचणी येत असल्यामुळे त्यांनी हा बंगला विकल्याची माहिती मिळाली आहे. जाटिया कुटुंबियाती बहुतांश लोक विदेशात आहेत.

मलबार हिलवर 'जाटिया हाऊस' शेजारी 'मेहेरनगिर बंगला' आहे. भारतातील अॅटॉमिक एनर्जी प्रोग्रामचे जनक होमी भाभा एके काळात या बंगल्यात राहात होते. 17150 स्क्वेअर फूट जागेत असलेला हा बंगला मागील वर्षी उद्योगपती जमशेद गोदरेज यांची बहिण स्मिता कृष्णाने 372 कोटी रुपयांत खरेदी केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलबार हिल येथील 'जाटिया हाऊस'चे फोटो...