आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एल अँड टी’ने दिला १४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अँड टुब्रो या कंपनीने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत अापल्या विविध व्यवसायांत कार्यरत असलेल्या एकूण १४ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली अाहे. सध्या कंपनीला अनेक अार्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागत असून अशा परिस्थितीत स्पर्धात्मक राहण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले अाहे. व्यवसायात अालेल्या मंदीचा हा परिणाम असून अलीकडच्या काळातील ही सर्वात माेठी नाेकर कपात अाहे.
एल अँड टीच्या विविध व्यवसायांत एकूण सव्वादाेन लाख कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १४ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात अाली असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अार. शंकर रमण यांनी सांगितले. परंतु ही कर्मचारी कपात नेमक्या काेणकोणत्या व्यवसाय क्षेत्रातील केली याबाबत त्यांनी तपशील देणे टाळले. जर व्यवसाय योग्य प्रकारे हाेत नसेल तर त्याला पुन्हा नीट अाकार देण्याचा प्रयत्न केला जाताे. त्यामुळे नाेकर कपात करणे हा एक धोरणात्मक निर्णय हाेता. व्यवसायाला पूर्वपदावर अाणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात अाले. त्यामुळे अनावश्यक वाटणाऱ्या नोकरीतून बाहेर जाण्याचा पर्याय खुला ठेवण्यात अाला. धातू अाणि खाण क्षेत्राबाबतही असे करण्यात अाल्याचे रमण यांनी सांगितले.

कंपनी अापल्या विविध व्यवसायांत स्पर्धात्मक राहण्याचा प्रयत्न करीत असून अावश्यक ठिकाणी डिजिटलचा वापर करण्यात येत अाहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दहा कर्मचाऱ्यांची गरज असेल तर ते काम पाच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. परंतु नाेकर कपातीचा हा निर्णय तात्पुरता असून भविष्यात नाेकर कपात करण्याची कोणतीही याेजना नसल्याचे
रमण यांनी स्पष्ट केले.
महसुलात वाढ
चालू अार्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ८.६ टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे ४६,८८५ काेटी रुपयांवर गेला, तर नफा मागील वर्षाच्या १,१९७ काेटी रुपयांवरून वाढून २,०४४ काेटी रुपयांवर गेला. पाच वर्षांत महसुलाला दाेन लाख काेटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...