आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै महिन्यातील अंतिम रिटर्न 15 सप्टेंबरपर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जुलै आणि ऑगस्टसाठी वस्तू आणि सेवा करासाठी (जीएसटी) परतावा दाखल करण्यासाठीची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. जुलैच्या विक्रीचा परतावा जीएसटीआर-१ सप्टेंबरच्या १ ते ५ तारखेपर्यंत भरात येणार आहे. ऑगस्टसाठी जीएसटीआर-१ दाखल करण्याचा दिनांक १६ ते २० सप्टेंबरपर्यंत आहे. व्यापाऱ्यांनी ज्या वस्तूंची खरेदी केली त्याचा जुलैचा परतावा जीएसटीआर-२ सप्टेंबरचा ६ ते १० तारखेपर्यंत भरात येणार आहे. 

आॅगस्टचा रिटर्न २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान भरता येणार आहे. खरेदी-विक्री मिळून जुलै महिन्यातील कर दायित्वासह जीएसटीआर-३ रिटर्न व्यापारी ११ ते १५ सप्टेंबरपर्यंत भरू शकतील, तर ऑगस्ट महिन्याचा परतावा भरण्याची तारीख २६ ते ३० सप्टेंबर आहे.  नवीन कर प्रणालीमध्ये दर महिन्याला जीएसटीआर-१ पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत, जीएसटीआर-२ १५ तारखेपर्यंत आणि जीएसटीआर-३ हा २० तारखेपर्यंत दाखल करावा लागणार आहे. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सवलत देण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतलेला आहे. सध्या व्यापाऱ्यांना केवळ जीएसटीआर-३ दाखल करायचा आहे. 

कराच्या टप्प्यांमुळे आव्हान : मोहन 
एका दशकाच्या संघर्षानंतर देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाला असला तरी कराचे अनेक टप्पे असल्यामुळे अनेक आव्हाने समोर येत असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्ट्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांनी म्हटले आहे. ‘इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नन्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बुधवारी बोलत होते. 
बातम्या आणखी आहेत...