आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVS च्या मालकांची कन्या, पाच वर्षांतच अब्जाधीश पतीला दिला घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ‍चिरंजीव रोहन मूर्ती व सून लक्ष्मी वेणु यांच्यात काडीमोड झाली आहे. लक्ष्मी वेणू ही टीव्हीएस कंपनीचे मालक वेणू श्रीवासन यांची कन्या आहे. रोहन आणि लक्ष्मी यांनी 31 ऑक्‍टोबरला सहमतीने घटस्‍फोट घेतला आहे. या अब्जाधीश जोडीचे 2011 मध्‍ये लग्‍न झाले होते.

रोहन आणि लक्ष्‍मी दोन वर्षांपासून एकमेकांपासून विभक्त राहात होते. घटस्‍फोटासाठी दोघांनी ए्प्रिलमध्ये कागदपत्रांची पूर्तता केली होती.

2014 मध्‍ये दोघांमध्ये खटकले...
रोहन आणि लक्ष्‍मी यांच्‍यातील वाद हा 2014 मध्‍ये समोर आला. विवाहानंतरची दोन वर्षे सर्वकाही ठीक होते. पण 2014 मध्‍ये लक्ष्मी यांचा भाऊ सुदर्शन यांच्‍या विवाहात निमंत्रण असूनही मूर्ती कुटुंबातील एकही सदस्य सहभागी झाला नाही. यावरून वाद विकोपाला गेला होता.

आधी मैत्री, नंतर प्रेम....
रोहन और लक्ष्मी यांची पहिली भेट सात-आठ वर्षांपूर्वी मित्राच्या घरी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. मूर्ती व वेणू कुटुंबांने दोघांना विवाहास संमती दिल्यानंतर ही जोडी 2011 मध्‍ये मोठा थाटात विवाहबद्ध झाली होती.

लक्ष्मी यांच्या मातोश्री मल्लिका श्रीनिवासन या त्यांच्यासाठी रोल मॉडेल ठरल्या. मल्लिका यांना देशाची ‘ट्रॅक्टर क्वीन’ असे संबोधले जाते. देशातील अग्रेसर ट्रॅक्टर कंपनी 'टाफे'च्या मल्लिका या सीईओ आहेत. लक्ष्मी सध्या टीव्हीएससाठी ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स निर्माता कंपनी सुंदरम क्लेयटनचे काम पाहातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लक्ष्मी वेणू व रोहन मूर्तींचे निवडक फोटोज....