आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या, पेमेंट बँकाचे परवाने काही महिन्यांत, छोट्या बँकांसाठी ७२ , पेमेंट बँकांसाठी ४१ अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या व पेमेंट बँकांच्या परवान्यासाठी आणखी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी दिली. नव्या बँकांसाठी १०० हून जास्त अर्ज आले असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे छोट्या बँकांसाठी ७२ , पेमेंट बँकांसाठी ४१ अर्ज आले आहेत. आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या हेतूने या बँका स्थापन करण्यात येणार आहेत. छोट्या बँका ठेवी स्वीकारण्याबरोबरच छोटे व्यावसायिक आणि असंघटित क्षेत्रांसाठी कर्ज पूरवठा करणार आहेत. तर पेमेट बँका कर्ज पूरवठा करणार नाहीत. यात एका ठिकाणी रक्कम जमा करून दुसऱ्या ठिकाणी ती काढली जाऊ शकते. घरांपासून दूर काम करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर राहणार आहे.

गांधी यांनी सांगितले, अलिकडच्या काही महिन्यात देशातील बँकांची पोहोच वाढली आहे. मात्र अजूनही मोठी लोकसंख्या वित्तीय सेवांपासून दूर आहे. त्यांनी सांगितले, देशात १५० व्यावसायिक बँक आणि सुमारे २७०० सहकारी बँका आहेत. या शिवाय केवळ ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे औपचारिक बँक खाते आहे. गांधी यांनी सांगितले, व्यावसायिक बँकांत २६ सरकारी, २० खासगी, ४४ विदेशी , ४ लोकल एरिया आणि ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँका आहेत.