आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local IT Hardware Sector Can Generate 4 Lakh Jobs: MAIT

आयटी, हार्डवेअर क्षेत्रात चार लाख रोजगार : मॅट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील आयटी आणि हार्डवेअर क्षेत्रात पुढील पाच वर्षांत चार लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने पुढील अर्थसंकल्पात नोटबुक आणि डेस्क टॉप काॅम्प्युटर (पीसी) च्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता करप्रणालीत सुधारणा करावी. उद्योग संस्था माहिती तंत्रज्ञान मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (मॅट)ने आपल्या एका अहवालात ही शक्यता वर्तवली आहे.

मॅटचे कार्यकारी संचालक अन्वर शिरपूरवाला यांनी सांगितले की, देशात वर्षाकाठी तीन कोटी पीसींची मागणी राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत देशात उत्पादनाची मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात उपाय करण्यात आल्यास देशातील आयटी उत्पादन क्षेत्रात चार लाख नोकरीच्या संधी तयार होऊ शकतात.

पुढील पाच वर्षांत आयटी क्षेत्रात प्रत्यक्ष स्वरूपात, तर तीन लाख नोकऱ्या अप्रत्यक्ष स्वरूपात इतर सहायक साहित्य उत्पादन क्षेत्रात तयार हाेण्याची शक्यता असल्याचे मॅटच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात समोर आले आहे. धोरणांमध्ये सुधारणा आणि बाजाराला अनुकूल वातावरण तयार केल्यास एका वर्षातच आयटी, हार्डवेअरचे उत्पादन दुपटीने वाढवून २६० कोटी डाॅलर (सुमारे १७,८२८ कोटी रुपये) करता येऊ शकते. यासोबतच जगभरातील "इलेक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाइन'मध्ये तसेच उत्पादनात (ईएसडीएम) पुरवठा करण्यासाठी भारत हब बनू शकते.

माहिती तंत्रज्ञान मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (मॅट)च्या काही सदस्यांच्या वतीने मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये चीप बनवणारी इंटेल, पर्सनल कॉम्प्युटर बनवणारी लेनेवो तसेच सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी मायक्रोसाॅफ्टचा समावेश आहे.

मॅटच्या मागण्या
मॅटने अर्थसंकल्पात नोटबुक पीसी आणि डेस्क टॉप पीसीवर उत्पादन शुल्क कमी करून दोन टक्के करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पीसीचे विविध सुटे भाग, कंपोनंट आणि सबअॅसेंब्लीवर उत्पादन शुल्कात सूट देण्याची मागणी केली आहे.