आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय IT कंपन्यांचे 22000 कोटी बुडाले, अमेरिकेतील व्हिसा नियम कडक झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकेमध्ये एच-वन-बी व्हिसा नियम कडक करण्यात येण्याविषयी चिंता वाढल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार घसरण नोंदवण्यात आली आहे. विक्रीच्या माऱ्यामुळे आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये चार टक्क्यांची घसरण झाली. विक्रीमुळे दिग्गज आयटी कंपन्या इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक या कंपन्यांचे भांडवली मूल्य सुमारे २२ हजार कोटी रुपयांनी खाली आले.
  
अमेरिकेतील खासदार डॉलर इसा, स्काॅट पीटर यांनी एच-वन-बी व्हिसाचे नियम कडक करण्यासाठी संसदेत पुन्हा एकदा विधेयक सादर केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारतातील आयटी तज्ज्ञांच्या अमेरिकेत जाण्याच्या  मोठ्या प्रमाणामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. या विधेयकात एच-वन बी व्हिसा असणाऱ्यांचा पगार कमीत कमी एक लाख डॉलर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच पदविकाधारकांना मिळणारी सूटदेखील रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अमेरिकेतून हे वृत्त येताच भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये आयटी क्षेत्रातील सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

ट्रम्प यांच्या ट्विटचा परिणाम  
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटचा परिणाम कॉर्पोरेट जगतावर वारंवार होत आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बोइंगवर केलेल्या ट्विटमुळे कंपनीचे शेअर एक अब्ज डॉलरने खाली होते, तर त्यांनी शुक्रवारी टोयोटाबाबत केलेल्या ट्विटमुळे या कंपनीला फक्त पाच मिनिटांत ८१५६ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.