मुंबई- देशातील टॉप बिझनेसमन व रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची लव्ह स्टोरी फारच रोमांचक आहे. 'देशातील टॉप बिझनेसमची लव्ह स्टोरी' या सीरीजमध्ये आज आम्ही आपल्याला रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे धाकटे पुत्र अनिल अंबानी यांच्या लव्ह लाईफ घेऊन आलो आहे.
टॉप बिझनेसमन आणि एक अॅक्ट्रेसच्या लव्हस्टोरीने अनेक चढउतार पाहिले आहेत. अनिल अंबानी यांनी टीना मुनीम यांना एका विवाह समारंभात पाहिले होते. टीना या ब्लॅक ड्रेसमध्ये होत्या. तेव्हापासून त्या अनिल अंबानी यांना भावल्या होत्या. दोघांची दुसरी भेट अमेरिकेत झाली. मात्र, या भेटत दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. नंतर दोघे 1986 मध्ये भेटले. परंतु, टीना या अनिल अंबानींना अवॉइड करत होत्या. अनिल यांना भेटण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती.
अनिल यांच्या वारंवार बोलवण्यावरून टीना कमालीच्या चिडल्या होत्या. मात्र, नंतरच्या भेटीत चमत्मार घडला. तो म्हणजे अनिल यांच्या 'सिम्प्लिसिटी'वर टीना प्रचंड प्रभावित झाल्य होत्या. त्या देखील अनिल यांना पसंत करू लागल्या. दोघे अनेक महिने डेटवर होते. या काळात टीना यांनी बॉलिवूडशी देखील नाते तोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र, अनिल आणि टीना यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. एखादी अॅक्ट्रेस अंबानींच्या घरची सून बनेल, ही कल्पनाच ते करू शकत नव्हते. घरच्या मंडळींकडून विरोध झाल्यामुळे अनिल आणि टीना यांनी मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांना एकमेकांना विसरणे शक्य नव्हते. तब्बल चार वर्षे दोघे एकमेकांना भेटले नाही.
टीना यांना बॉलिवूडशी फारकत घेऊन इंटीरियर डिझाइनिंगचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेला गेल्या. दुसरीकडे अनिल यांना चांगल्या घराण्यातील मुली सांगून येत होत्या. मात्र, अनिल प्रत्येकदा नकारच देत होते.
या लव्ह स्टोरीचा क्लायमेक्स अजून बाकी होता. 1989 मध्ये लॉस एंजिलिसमध्ये भूकंप झाला होता. अनिल यांनी कोणताही विचार न करता टीना यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांचे हालहवाल जाणून घेतले. टीना सुखरुप होत्या. त्यानंतर मात्र, अनिल यांनी आपल्या कुटुंबियांकडे पुन्हा टीना यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. शेवटी अंबानी परिवाराने अनिल आणि टीना यांच्या विवाहाला संमती दिली. दोघांचे परिवार एकमेकांना भेटले आणि विवाहाची तयारी सुरु केली. अनिल आणि टीना 1991मध्ये लग्नाचा बेडीत अडकले.
पुढील स्लाइडवर पाहा, अनिल अंबानी आणि टीना यांचे फोटो...