आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी गुंतवणूक, नाेटाबंदीने भारताचा विकास दरात घटणार : एडीबी, अंदाज 7.4 टक्क्यांवरून कमी करून 7 % केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला : केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या मोठ्या नोटाबंदीनंतर तसेच देशांतर्गत गुंतवणूक आणि कृषी उत्पादनात मंदी येण्याची शक्यता असल्यामुळे एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) या वर्षी २०१६ साठीचा भारताचा विकास दर अंदाज ७.४ टक्क्यांवरून कमी करून ७ टक्के केला आहे.
नोटाबंदीचा सर्वाधिक परिणाम नगदी व्यवहारावर आधारित छोट्या तसेच मध्यम व्यवसायावर होणार असल्याचेही बँकेने अापल्या अहवालात नमूद केले आहे.

असे असले तरी नोटाबंदीचा हा परिणाम खूपच अल्प काळासाठी राहणार असून त्यानंतर वर्ष २०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढून पुन्हा ७.८ टक्क्यांवर पोहोचणार असल्याचेही ‘एशियाई विकास परिदृश्य, २०१६’ नावाने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात बँकेने स्पष्ट केले आहे.

याआधी चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनेदेखील विकास दराच्या अंदाजात अर्धा टक्क्याची कपात करून ७.६ टक्क्यांवरून ७.१ टक्के विकास दर राहण्याची शक्यता वर्तवली होती.
एडीबीने भारतासह संपूर्ण आशियातील विकास दराच्या अंदाजातही कपात केली आहे. आशिया साठीचा विकास दर अंदाज ५.७ टक्क्यांवरून कमी करून ५.६ टक्के तसेच दक्षिण आशिया साठीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून कमी करून ६.६ टक्के करण्यात आला आहे.

जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील विकास दरदेखील या वर्षी ६.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर त्याच्या पुढील वर्षी चीनचा विकास दर ६.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
मलेशिया आणि फिलिपाइन्समध्ये विकास दरात वाढ होण्याची अपेक्षा असल्यामुळे दक्षिण पूर्ण आशियाचा विकास दर अंदाज वर्ष २०१६ साठी ४.५ टक्के तसेच २०१७ साठी ४.६ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.
मध्य आशियासाठी या वर्षी आणि पुढील वर्षी विकास दर अंदाज क्रमश: १.५ टक्के तसेच २.६ टक्के ठेवण्यात आला आहे. प्रशांत क्षेत्रासाठी क्रमश: २.७ टक्के तसेच ३.३ टक्के अंदाज ठेवण्यात आला आहे.

डिसेंबर तिमाहीत ५.५ टक्के वाढ : बँक आॅफ अमेरिका
नोटाबंदीनंतर नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात मागणी घटल्यामुळे ऑक्टोबर - डिसेंबर तिमाहीत जीडीपीत फक्त ५.५ ते ६ टक्क्यांची वाढ होईल, असे मत अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांतील वाढीवर ०.३ ते ०.५ टक्के परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत बँकेने एका संशोधन नोटमध्ये व्यक्त केले आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई ४ टक्के, तर २०१८ मध्ये ५ टक्के राहणार असल्याचा अंदाजही अमेरिकी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...