आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलपीजी सबसिडी योजना गिनीज वर्ल्ड बुकात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वयंपाकाच्या गॅसवर दिली जाणारी सबसिडी थेट बँक खात्यांत हस्तांतरित करण्याची योजना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्याला जगातील सर्वात मोठा कॅश ट्रान्स्फर कार्यक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे.
केंद्र सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ऑन एलपीजी (डीबीटीएल) वा पहल ही योजना १५ नोव्हेंबर २०१४ ला ५४ जिल्ह्यांत सुरू केली होती. ती १ जानेवारी २०१५ पर्यंत संपूर्ण देशात लागू करण्यात आली. सरकारतर्फे दिले जाणारे अनुदान लाभार्थींपर्यंत पोहोचावे, इतर कुणालाही त्याचा फायदा होऊ नये, हॉटेल वा इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांत अनुदानावरील एलपीजी गॅसचा वापर होऊ नये, असा उद्देश या योजनेमागे होता. या योजनेत अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. त्यामुळे तो बाजारभावाने एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकतो. सध्या १३.९ कोटी एलपीजी ग्राहक या योजनेशी जुळलेले आहेत. सध्या प्रत्येक कुटुंबाला वार्षिक १४.२ किलोची १२ सिलिंडर्स सबसिडीवर दिली जातात.