आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ध्येय वेड्याने बनवले Mobile APP, कमवले 45 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- येथील एका होतकरु तरुणाने एक मोबाइल अॅप बनवून अवघ्या दोन वर्षात 45 लाख रुपये कमवले आहे. अंकित श्रीवास्तव असे या तरुणाचे नाव आहे. अंकितने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक म्युझिक अॅप तयार केले. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चा एखादा बिझनेस सुरु करण्याची अंकितची इच्छा आहे.

जाणून घ्या अंकितच्या अॅपमध्ये काय आहे खास?
- अंकित म्हणाला की, 2013मध्ये त्याने म्युझिक अॅपवर काम सुरु केले होते.
- अॅपसाठी त्याला एक वर्षाचा कालावधी लागला.
- अॅपला फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
- 19 जून 2016 पर्यंत या अॅपला एक कोटी 79 लाख 91 हजार लोकांनी पाहिले व डाऊनलोड केले.
- म्‍युझिक वर्ल्‍डमध्ये दोन वर्षात हे अॅप प्रचंड लोकप्रिय झाले.
- गूगल अॅडच्या माध्यमातून अंकितने जवळपास 45 लाख रुपयांची कमाई केली.

स्वत:ला सिद्ध करायचे होते....
- आई-वडीलांसमोर स्वत:ला सिद्ध करण्‍यासाठी अंकितने अॅप बनवले.
- अंकितने सांगितले की, CMS स्‍कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर कोटामधील सेंट जॉन स्‍कूलमधून इंटरमीडिएट पास केले.
- अंकितचे वडील मुकेश पीडब्‍लयूडीमध्ये सिव्हिल इंजिनियर आहे.
- जेपी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सोलन हिमाचल प्रदेशमधून अंकितने कॉम्प्यूटर सायन्स विषयात बीटेक केले.
- मुलाने नोकरी करावी. चांगला पगार मिळवावा, अशी अंकितच्या वडिलांना वाटत होते. मात्र, नोकरी करण्यात अंकितला थोडाही रस नव्हता.
- त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्‍यासाठी अंकितने अँड्रायड फोनच्या अॅपवर काम सुरु केले.
- या अॅपला गूगल प्‍ले स्‍टोअर्सवर 'अंकित श्रीवास्‍तव म्युझिक अॅप' नावाने सर्च करून तुम्हीही डाऊनलोड करु शकतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ध्येय वेड्या अंकित श्रीवास्‍तवचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...