आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Maggi Isn\'t Alone In This Controversy, These Brands Have Also Be In Controversy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MAGGI प्रमाणे या BRANDS मुळेही गेला आहे ग्राहकांच्या विश्वासाला तडा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'नेस्ले' कंपनीच्या जगप्रसिद्ध ‘मॅगी’या नूडल या ब्रँडमुळे देशातील लाखों ग्राहकांचा विश्वासाला तडा गेला आहे. 'मॅगी'मध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लूटोमॅटचे (एमएसजी) प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे. याप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) चौकशी करत आहे.

'नेस्ले इंडिया' आणि इतर पाच जणांवर उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (UPFDA) गुन्हा दाखल केला आहे. बाराबंकीचे फूड ऑफिसर व्ही.के.पांडे यांनी बाराबंकी येथील एका कोर्टात अन्न आणि सुरक्षा कायदा 2006 च्या कलम 58 आमि 59 नूसार तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, शनिवारी बाराबंकीच्या सीजीएम कोर्टात एका वकीलाने मॅगी नुडल्सची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री प्री‍ती झिंटा आणि माधुरी दीक्षित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
मात्र, यापूर्वीही भारतातील अनेक फास्‍ट फूड प्रॉडक्‍टवर अशा प्रकारचे आरोप झाले आहे. त्यात कोला कोला, पेप्‍सी, कॅडबरी, मॅकडोनाल्‍ड, सबवे आणि केएफसीसारख्या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे.

1. केएफसी
मागील वर्षी भारतीय अन्न सुरक्षा प्राधि‍करणाने (एफएसएसएआय) 'केएफसी'च्या ‘रि‍जो राइस’च्या नमुन्यांची तपासणी केली होती. आरोग्यास हानिकारक असलेले घटक यात सापडले होते. 'रिजो राइस'मध्ये कृत्रीम रंगाचा (आर्टि‍फि‍शि‍यल कलर) वापर अतिप्रमाणात करण्‍यात असल्याचे स्पष्‍ट झाले होते. केएफसीला देशातील सर्व आउटलेट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तसे होऊ शकले नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कोणते आहेत हे ब्रँड्स....
(टीप: छायाचित्राचा वापर सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे.)