Home »Business »Business Special» Maharashtra Can Now Take Direct Funds From Foreign

आता महाराष्ट्र थेट घेऊ शकेल अार्थिक मदत, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी मार्ग माेकळा

विशेष प्रतिनिधी | Apr 20, 2017, 03:00 AM IST

  • आता महाराष्ट्र थेट घेऊ शकेल अार्थिक मदत, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी मार्ग माेकळा
नवी दिल्ली -परदेशातून अार्थिक मदत घ्यायची असल्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या माध्यमातूनच जावे लागत हाेते. त्यामुळे अनेक राज्यांतील विविध प्रकल्प रखडले जात हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यांना विदेशातून थेट मदत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात अाली अाहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार अाहेत.
राज्यांना थेट विदेशातील कर्ज घेण्याची परवानगी असली तरी त्याची परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या त्या राज्य सरकारवर राहणार अाहे. मात्र, केंद्र सरकार हमीदार म्हणून अापली भूमिका बजावणार अाहे. अाजच्या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) जायका या जपानी कंपनीकडून मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी थेट मदत घेण्याची परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १७,८५४ कोटी रुपये असून त्यापैकी १५,१०९ कोटी रुपयांचा निधी जायका कंपनीकडून कर्ज स्वरूपात महाराष्ट्र सरकारला घ्यायचा अाहे. विदेशातील माेठ्या वित्तीय संस्था या सातत्याने भारतातील माेठ्या प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी अर्थसाहाय्य करीत अाल्या अाहेत. अनेक सामाजिक संस्थांनाही अर्थसाहाय्य झाले अाहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांत भाजपचे सरकार अाहे. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांचेही महत्त्वाच्या प्रकल्पासाठी विदेशी कंपन्यांकडून अर्थसाहाय्य घेण्याचे प्रस्तावित अाहे. त्यांचा केंद्राकडून हाेणारा अडसर अाणि लांबलचक प्रक्रिया यातून सुटका करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात अाला अाहे. राज्यांना कायमच निधीची कमतरता असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी बहुराष्ट्रीय संस्थांचे महत्त्व आहे.

Next Article

Recommended