आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सरकारचे नवे पर्यटन धोरण पुढील वर्षात जाहीर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सरकारचे नवे पर्यटन धाेरण पुढील वर्षात जाहीर हाेणार अाहे. या प्रस्तावित पर्यटन धाेरणाचा मसुदा सरकारने जाहीर केला. या नव्या धाेरणासाठी ३० िडसेंबरपर्यंत सूचना आणि हरकती जनतेकडून मागवण्यात अाल्या अाहेत. पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी ३० हजार काेटी रुपयांची गुंतवणूक अाकर्षित करणे तसेच एक दशलक्ष नाेकऱ्या िनर्माण करण्याचे लक्ष्य देण्यात अाले अाहे.

प्रस्तावित धाेरणामध्ये प्रादेशिक तसेच स्थानिक पर्यटनाचे पर्याय विस्तारण्यात येणार असल्याचे अहवालामध्ये म्हटले अाहे. पर्यटनामध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थान िमळवून देण्याच्या दृष्टीने भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार अाहेत. खासगी गुंतवणूक अाकर्षित करण्याबराेबरच सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला सशक्त करण्याचा या धाेरणाचा उद्देश अाहे. या मुळे पाच वर्षांमध्ये पर्यटन प्रकल्पांमध्ये दुप्पट तर दहा वर्षांमध्ये तिप्पट वाढ हाेईल, असा विश्वास पर्यटन अाणि सांस्कृतिक विभागाच्या सचिव वल्सा नायर यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...