आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधान भवनात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भांडूप परिमंडळातील ग्राहकांना एलईडी बल्बचे वाटप करून एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रति बल्ब १८० रुपये वार्षिक बचत होईल.

योजनेनुसार प्रत्येक ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्याची तरतूद असून आहे. त्याची किंमत १०० रुपये असेल. एसएमएस, ईमेल किंवा कक्षावर यासाठी नोंदणी करता येऊ शकते. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना जाहीर केली आहे. राज्यातही ही योजना सुरू करण्यात आली आहे. या वेळी खा. किरीट सोमय्या, आ. राज पुरोहित, अप्पर मुख्य सचिव मीना, प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर, ओमप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...