आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahasarhtra Leading In Getting Fund For Home For All Scheme

‘सर्वांसाठी घर’ योजनेत महाराष्ट्र पुढे, ४००० कोटींपैकी सर्वाधिक ५६१ कोटी राज्याला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घर’ योजनेअंतर्गत राज्यांना ४००० कोटी रुपयांचा पहिला टप्पा दिला आहे. ही योजना सुरू करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. यातील सर्वाधिक ५६१ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशला ३७० कोटी रुपये मिळाले आहेत. पश्चिम बंगालला ३०७ कोटी, मध्य प्रदेशला २५३ कोटी, आंध्र प्रदेशला २२५ कोटी तर कर्नाटकला २०४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सरकारने २५ जून रोजी "हाउसिंग फॉर आल स्कीम' (शहर) सादर केली होती. सध्या देशात जवळपास २ कोटी घरांची कमतरता आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना राज्य पातळीवर तांत्रिक सेल तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेमध्ये ज्या शहरात घरे बनवली जाणार आहेत, तेथील नगरपालिका, परिषदा किंवा विकास अॅथॉरिटींमध्ये कर्मचारी वाढवण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.

खासगी क्षेत्राला जोडणार
या योजनेमध्ये खासगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्निर्माण योजना लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच स्वस्त घरांच्या योजनेत खासगी विकासकांना जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पांना स्वस्त कर्जाबरोबरच केंद्र सरकारच्या वतीने सबसिडी आणि अनुदानदेखील देण्यात येणार आहे.

कोणत्या राज्यांना किती पैसे
बिहार : ८७.४५ कोटी
छतीसगड : ८३.८२ कोटी
दिल्ली : १२२.४८ कोटी
गुजरात : १७२.९९ कोटी
हरियाणा : ८४.२८ कोटी
जम्मू-कश्मीर : ३४.१३ कोटी
झारखंड : ५५.१४ कोटी
मध्य प्रदेश : २५३.२३ कोटी
महाराष्ट्र : ५६१.७४ कोटी
पंजाब : ८६.२५ कोटी
राजस्थान : १३९.०५ कोटी
उत्तराखंड : २७.२५ कोटी
हिमाचल : ५०.११ कोटी