आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महावितरणचे राज्यात पाच लाख अॅप डाऊनलोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महावितरणने डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. अडीच महिन्यांपूर्वी महावितरणने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी ‘मोबाइल अॅप’ सुरू केले. प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. एव्हाना राज्यातील पाच लाखांवर ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केले आहे. त्यातून अॅपची उपयुक्ततादेखील सिद्ध झाली आहे.

मोबाइल अॅपमध्ये अॅड कनेक्शनचा पर्याय असून, त्याद्वारे एकापेक्षा जास्त कनेक्शन समाविष्ट करता येतात. ज्या ग्राहकांकडे घर, दुकान, शेती यासारख्या अनेक जोडण्या आहेत, त्याबाबत माहिती एकाच अॅपमधून मिळणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून महावितरणच्या सेवेबाबत ग्राहकांना फीडबॅक देण्याचा पर्याय दिला आहे.

त्यामुळे सेवेचा दर्जा उंचावता येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वीज ग्राहकांच्या मोबाइल अॅपमधून उच्च व लघुदाब वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे व त्याचा भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डासह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे. भरलेल्या पावतीचा तपशील मिळणार आहे. या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने महावितरणचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.

अॅप डाऊनलोड असे
- वेबसाइटद्वारे ७७४०१
- गुगल प्ले स्टोअर ४,३५,४२९
- अॅपल प्ले स्टोअर १७,२७६
- विंडोज स्टोअर ८४५०
- एकूण ५, ३८,५५६

प्रभावी प्रचार यंत्रणा
अॅपबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने होर्डिंग्ज, पँफ्लेट्स, स्टॉल्स लावून प्रचार करण्यात आला. इतकेच नाही तर महावितरणने सोशल मीडियावर अॅपची माहिती देणारे जिंगल टाकले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक या संकेतस्थळावरून ग्राहकांना अॅपविषयी माहिती देण्यात येत आहे. - विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, अकोला.
बातम्या आणखी आहेत...