आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची इलेक्ट्रिक कार ९२ हजारांनी स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहन िनर्मिती क्षेत्रात अाघाडीवर असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने अापल्या इलेक्ट्रिक माेटारीच्या िकमतीत कपात करून ग्राहकांना सुखद धक्का िदला अाहे. ‘ई२अाे’ या छाेटेखानी इलेक्ट्रिक माेटारीच्या िकमतीमध्ये ९२ हजार रुपयांनी कमी केली अाहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक अाणि हायब्रीड वाहनांसाठी सवलत याेजना जाहीर केली असून त्याचा लाभ महिंद्राने अापल्या ग्राहकांना िदला अाहे.

महिंद्रा अॅंड महिंद्रा समूहातील महिंद्रा रेव्हा इलेक्ट्रिक व्हेइकल या कंपनीकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या ‘ई२अाे’ या माेटारीच्या ५.७१ लाख रुपये या अगाेदरच्या िकमतीत अाता १६ टक्क्यांनी कपात कण्यात अाली अाहे. त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांसाठी (िकंवा ५० हजार िकलाेमीटरपर्यंत) प्रती महिना २,९९९ रुपये ऊर्जा शुल्क िनश्चित करण्यात अाले अहे. अाता ही माेटार ४.७९ लाख रुपयांत उपलब्ध हाेणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी (वाहन) प्रवीण शहा यांनी सांिगतले. केंद्र सरकारच्या फास्टर अॅडाॅप्शन अंॅड मॅन्युफॅक्चरिंग अाॅफ हैदराबाद अाणि याेजनेंतर्गत इलेक्ट्रिक अाणि हायब्रीड वाहनांसाठी माेठ्या प्रमाणावर सवलत देण्यात येते.
माेटारसायकलींसाठी २९ हजार रुपये तर माेटारींसाठी ही सवलत १.३८ लाख रुपयांपर्यंत अाहे.