आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सी कंपन्यांवर टीका करणाऱ्या महिंद्राचा ओला टॅक्सीशी करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टॅक्सी कंपन्यांवर टीका करणाऱ्या महिंद्रा ऑटोमोबाइलने आता ओला टॅक्सीशी गुरुवारी एक करार केला आहे. करारानुसार महिंद्रा कंपनीच्या कार विकत घेण्यासाठी ओला वाहनचालकांना १०० टक्के अर्थसाहाय्य दिले जाईल.

नवी कार तसेच महिंद्रा फर्स्ट चॉइसची जुनी वाहने तसेच वाहनांचे सुटे भाग आणि विक्रीनंतरच्या सेवेतही सवलत दिली जाईल. या करारातून कंपनीला सुमारे २६०० कोटींचा महसूल मिळू शकते, अशी महिंद्राची अपेक्षा आहे. पुढील दोन वर्षांत महिंद्राच्या ४० हजार कार विकल्या जातील, अशी अपेक्षा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी याच वर्षी टॅक्सी अॅग्रिगेटर्स या ऑटोमोबाइल कंपन्यांसाठी घातक असल्याचे म्हटले होते. मात्र, गुरुवारी याबाबत स्पष्टीकरण देताना महिंद्रा म्हणाले, भविष्यातील वाटचालीसाठी दोन्ही क्षेत्रांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. अन्य कंपन्यांसोबतही अशाप्रकारचे करार करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ओलाचे सहसंस्थापक भविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
यापूर्वी टाटा मोटर्सने उबेरसोबत निसानने ओलाशी असा करार केला. त्यानुसार कंपन्या कार विकत घेऊन वाहनचालकांना वापरण्यास देतील. भारतातील टॅक्सी व्यवसाय सध्या ८० हजार कोटींच्या घरात आहे.
बातम्या आणखी आहेत...