आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक किमतीत महिंद्राची ‘टी 10’ प्रकारातील नवी बोल्ड आणि स्टायलिश टीयूव्ही 300 सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड एसयूव्ही उत्पादक कंपनीने आरामदायी हाय अँड ‘टी १०’ प्रकारातील नवी बोल्ड आणि स्टायलिश टीयूव्ही ३०० सादर केली आहे. ९.६६ लाख रुपये (एक्स शोरूम, पुणे) या आकर्षक किमतीत देशातील सर्व अधिकृत वितरकांकडे आरक्षणाला सुरुवात झाली आहे.  

टीयूव्ही ३०० मध्ये नवीन हाय अँड १७.८ सेमी (७’’) च्या रंगीत टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम जीपीएस नेव्हिगेशनसह सादर केले आहे. तसेच प्लॅश फॉक्स लेदर सीट्सचाही समावेश आहे. आरामदायी आणि हाय-टेक - टी -१० प्रकारातील टीयूव्ही ३०० सादर करताना  आम्हाला आनंद होत असून आमच्या सूक्ष्मदृष्टी  ग्राहकांसाठी ही गाडी तयार करण्यात आली असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा  लिमिटेडच्या  विक्री आणि वितरण आणि स्वयंचलित क्षेत्राचे प्रमुख  विजय राम नाकरा यांनी सांगितले. टीयूव्ही ३०० ने  यापूर्वीच कॉम्पॅक्ट एसयूव्ही  प्रकारात स्थान प्रस्थापित  केले आहे. या गाडीचे ६०,००० समाधानी ग्राहक असल्याचेही त्यांनी सांगितले. या नव्या गाडीत ग्राहकांना आकर्षक रंग निवडण्याची संधी आहे. यात प्रामुख्याने  दुहेरी रंगांमध्ये लाल आणि पिवळा, चंदेरी आणि काळा तसेच बोल्ड ब्लॅक आदी रंग उपलब्ध आहेत. याशिवाय पर्ल व्हाइट रंग पहिल्यांदाच सादर करण्यात आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...