आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिंद्राची ‘एक्सयूव्ही-५००’ नव्या रूपात Launh, अनेक नवे फिचर्स उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ‘एक्सयूव्ही-५००’ पुन्हा नव्या रूपात बाजारात दाखल केली अाहे. नव्या तंत्रज्ञानाबराेबरच अंतर्गत रचना, सुरक्षात्मक उपाययाेजनांचा समावेश असलेली नवी एक्सयूव्ही-५०० सहा नवीन प्रकारांत उपलब्ध हाेणार अाहे. निसान टेरानो, टाटा सफारी स्टाॅर्म, रेनाॅल्ट डस्टर या एसयूव्हींना महिंद्राची ही नवा साज ल्यालेली एक्सयूव्ही टक्कर देण्याची शक्यता अाहे.

ग्राहकांच्या पसंतीस पडलेल्या या एक्सयूव्हीने चांगल्या विक्रीची नाेंद केली हाेती. कंपनीच्या पुण्याजवळील चाकण प्रकल्पात या एसयूव्हीची निर्मिती करण्यात येत अाहे. महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शहा म्हणाले, केवळ तीन वर्षांत एक लाख गाड्यांची विक्री होऊन सर्वात वेगाने विकली गेलेली (१० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वर्गातील) एसयूव्ही म्हणून तिचा लौकिक प्रस्थापित झाला.

न्यू एज एक्सयूव्ही-५०० ची नवी वैशिष्ट्ये
{ क्रोम इन्सर्ट्ससह शैलीदार फ्रंट ग्रिल.
{ पंज्याच्या रचनेचे दरवाजाचे हँडल्स.
{ किल्लीशिवाय प्रवेश करता येऊ शकण्याची यंत्रणा
{ किंमत ११.१२ लाख रु.
बातम्या आणखी आहेत...