आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मेक इन इंडिया'साठी स्थानिक उद्याेगांना आधार द्या : सिन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अगाेदर स्थानिक उद्याेगांना आधार देण्याची गरज आहे. चीनमधून आयात हाेणार्‍या उत्पादनांच्या भरमसाट प्रमाणामुळे भारतीय उद्याेग अडचणीत येत आहेत. भारतातील सिमलेस इंडस्ट्रीदेखील याचप्रकारे अडचणीत आली आहे. सहा महिन्यांत भेल, आॅइल इंडिया लिमिटेड आणि आेएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सर्व आॅर्डर्स चीनच्या कंपन्यांना दिल्या गेल्या आहेत. सरकारच्या अशा धाेरणांमुळे देशातील उद्याेगांची वाटचाल आजारी उद्याेगांकडे हाेत असल्याकडे सिमलेस ट्यूब मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश सिन्हा यांनी लक्ष वेधले.

केंद्र शासनाकडून हवी ही मदत : चीन सरकार त्यांच्या उद्याेगांना िनर्यातीकरिता माेठ्या प्रमाणावर अनुदान देते, त्यामुळे त्यांची किंमत कमी असते. भारतातील उद्याेगांना त्यांच्याशी स्पर्धा करणे मात्र कठीण हाेत आहे. यामुळे सर्वच देशांनी स्वीकारलेले आयातीवरील निर्बंध भारताने स्वीकारायला हवेत. अशा प्रकारे आयात उत्पादनांमध्ये स्थानिक घटकांंचा समावेश केला जावा, जेणेकरून स्थानिक उद्याेगांना त्याचा फायदा हाेऊ शकेल, अशी मागणी केंद्रीय पेट्राेलियम आणि गॅस मंत्र्यांकडे असाेसिएशनने केली असल्याचे सिन्हा यांनी म्हणाले. या वेळी निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, माजी अध्यक्ष मनीष काेठारी आदी उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...