आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा तयार करा स्वत:चा ATM पिन; मनी ट्रान्सफरही होईल फास्ट,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सध्या ई-सर्व्हिसेसवर संचलित दाेन सुविधांमुळे नागरिकांची बँकेची कामे सुलभरीत्या हाेणार अाहेत. त्यामध्ये नवा एटीएम क्रमांक करण्याची सुविधा महत्त्वपूर्ण अाहे. तसेच इंटरनेट नसताना पैसे ट्रान्स्फर करण्याचे काम करणारी सुविधाही लाभदायी ठरणारी अाहे. यातून ग्राहकांना दरराेजच्या बऱ्याच कटकटीतून बाहेर पडता येणार अाहे. मुळात एटीएम क्रमांक विसरून जाण्याची सवय अनेकांना असते. नवा क्रमांक मिळवताना हाेणारी दमछाक पाहता ही सुविधा याेग्य ठरणार अाहे. त्याचबराेबर माेबाइलवर इंटरनेटची सुविधा नसली तरी ई-बडीच्या माध्यमातून काेणत्याही वेळी काेणत्याही नातेवाइकाला पैसे पाठवता येतील.

एटीएम पिन विसरलात चिंता नाही
एटीएमचा पिन क्रमांक विसरण्याची सवय घातक ठरते. त्यासाठी पुन्हा बँकेला गाेपनीय पिन क्रमांक तयार करावा लागताे. मात्र, स्टेट बँकेने तयार केलेल्या यंत्रणेनुसार स्वत:च हा पिन क्रमांक तयार करता येईल. त्याचबराेबर त्याची गाेपनीय माहिती बाहेर जाण्याची भीतीही उरणार नाही. कारण हा क्रमांक वापरताना केवळ ग्राहकालाच त्याची माहिती असेल. मात्र, ही सुविधा घेण्यासाठी बँकेकडे अापला माेबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला पाहिजे. एटीएम क्रमांक विसरल्यास त्यासाठी बँकेत पुन्हा अर्ज करावा लागताे. त्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसांनंतर हा क्रमांक मिळताे.

पुढील स्लाइडवर वाचा, केंद्रांवर देणार माहिती, नव्याने करता येईल एटीएमचा पिन क्रमांक, ई-बडीतून इंटरनेटविना करता येईल ट्रॅव्हल्स अाणि हाॅटेल्सची बुकिंग....
बातम्या आणखी आहेत...