आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मत: हात नसलेल्या युवकाने सुरु केले ऑनलाइन स्टोअर; महिन्याकाठी कमावतो 3 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- जन्मत: हात नसलेल्या चेन जिफेंग या युवकाने समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. चेनने अपंगत्वावर मात करून एक सक्सेसफूल बिझनेसमन ठरला आहे. त्याने ऑनलाइन स्टोअर (ई-कॉमर्स वेससाइट) सुरु केले आहे. बिझनेसमधून तो महिन्याकाठी तीन लाख रुपये कमावतो. पायांच्या बोटांनी कॉम्प्युटर ऑपरेट करून ग्राहकांच्या संपर्कात राहातो.

ऑनलाइन स्टोअरमधून कमावतो लाखों रुपये...
- चीनमधील हुबाई प्रॉव्हिन्सच्या बोडोंग काउंटीमध्ये 27 वर्षीय चेन जिफेंग आपल्या फॅमिलीसोबत राहातो.
- जन्मत: हात नसलेला चेन कसा जगेल? अशी चिंता त्याच्या आई-वडिलांना खात होती. मात्र, चेनने पायाच्या बोटांच्या बळावर आज आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.
- चेन आपल्या पायाच्या बोटांनी प्रत्येक काम सहज करतो.
- चेन स्वयंपाक बनवण्यापासून लाकूड तोडण्याच्या कामात आई- वडिलांना मदत करतो.
- चेनने एक ऑनलाइन स्टोअर सुरु केले. या माध्यमातून त्याने अवघ्या 10 दिवसांत त्याने 10 हजार युआन अर्थात एक लाख रुपये कमावले.
- रात्री उशीरापर्यंत तो ग्राहकांशी संवाद साधतो व फीडबॅकही देखील घेतो.

पुढील स्लाइडवर पाहा, जन्मत: हात नसलेल्या चेन याने असे सुरु केले ऑनलाइन स्टोअर...
बातम्या आणखी आहेत...