आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Cabinet Okays Civil Aviation Policy, Airfares To Be Capped For Short haul Flights

मुंबई विमान प्रवास फक्त 2500 रुपयांत; नव्या उड्डयन धोरणाला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद- लवकरच अवघ्या २५०० रुपयांत एक तासाचा विमान प्रवास करता येईल. अर्ध्या तासाचाच प्रवास असल्यास त्यासाठी फक्त १२०० रुपये मोजावे लागतील. बुधवारी मंजूर झालेल्या नव्या उड्डयन धोरणात या तरतुदी करण्यात अाल्या आहेत. त्यात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणामुळे औरंगाबाद ते मुंबईचा विमान प्रवास अवघ्या २५०० रुपयात शक्य होईल.

औरंगाबादहून आज मुुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद या तीन शहरांसाठी विमाने उड्डाण करतात. मात्र, मुंबईचा प्रवास वगळता अन्य दोन्ही शहरांसाठी याचा फायदा होणार नाही.

औरंगाबाद ते मुंबई प्रवासासाठी ४५ मिनिटे लागतात. यासाठी ४ ते साडेचार हजार रुपये तिकीट आहे. मात्र, ६० मिनिटांच्या आतील प्रवास असल्यामुळे यासाठी आता केवळ २५०० रुपये लागतील. औरंगाबाद दिल्ली प्रवास १ तास ५० मिनिटांचा तर औरंगाबाद-हैदराबाद प्रवास १ तास १० मिनिटांचा आहे. यामुळे या दोन्ही शहरांसाठी हे नवीन दर लागू नसतील. नागरी उड्डयन मंत्री गजपती राजू यांनी कॅबिनेट बैठकीनंतर सांगितले की, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांना हवाई सेवेशी जोडणे या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे मध्यमवर्गातील ३५ कोटी लाेकांना स्वस्तात सेवा मिळू शकेल. त्यासाठी केवळ १.२ टक्के सेवाकर आकारला जाईल. राज्यांना विमान
घटवण्यास सांगितले जाईल. ज्या शहरांतून एकाही विमान उड्डाण होत नाही तेथे सेवा सुरू केल्यास विमान कंपन्यंाना अनेक सवलती मिळतील. इंधनावर फक्त २ टक्के उत्पादन शुल्क लागेल. लँडिंग, पार्किंग वा नॅव्हिगेशन शुल्क द्यावे लागणार नाही. राजू म्हणाले की, उड्डयन क्षेत्रात २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरा मोठा देश होईल. सध्या आपण दहाव्या स्थानी अाहोत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपाेर्ट असोसिएशननुसार एप्रिलमध्ये देशांतर्गत हवाई दळणवळण २२ टक्क्यांनी वाढले आहे. दळणवळण विकासदराच्या बाबतीत भारत १३ महिन्यांपासून प्रथम स्थानी आहे.

एअरपोर्ट अॅथॉरिटीनुसार २०१५-१६ मध्ये १६.८९ कोटी लोकांनी देशात आणि ५.४ कोटी लोकांनी परदेशात विमान प्रवास केला आहे. देशांतर्गत मार्गांवर २०२२ पर्यंत वार्षिक तिकीट विक्री ३० कोटी व २०२७ पर्यंत ५० कोटींवर जाण्याची आशा आहे.

प्रवासी भाड्यातील बदल
औरंगाबाद-मुंबई

कालावधी: ४५ मिनिटे
सध्या : ४००० ते ४५०० रुपये.
प्रस्तावित : २५०० रुपये.

औरंगाबाद-दिल्ली
कालावधी:१.५० तास
सध्या : ७००० ते ८००० रुपये.
प्रस्तावित : फरक नाही

औ.बाद-हैदराबाद
कालावधी: १.१० तास
सध्या : ३००० ते ३५०० रुपये
प्रस्तावित : फरक नाही