आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jewellers Get Time Till July 1 For Excise Registration

सुवर्णकारांसाठी अबकारी शुल्क नोंदणी १ जुलैपर्यंंत, लाहिरींच्‍या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने सुवर्णकारांसाठी अबकारी शुल्क नोंदणी कालमर्यादा १ जुलैपर्यंत वाढवली आहे. तथापि अबकारी शुल्क मात्र १ मार्च २०१६ पासूनच लागू होणार आहे. या संदर्भात सर्वंकष अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने डॉ. अशोक लाहिरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ती सुवर्णकार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सरकारला अहवाल देणार आहे. या समितीत लहिरी यांच्यासह गौतम रे, कायदेतज्ज्ञ रोहन शाह, वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज कुमार आणि कर संशाेधन विभागाचे अतिरिक्त सचिव अालोक शुक्ला यांचा समावेश आहे.

अबकारी शुल्काविरोधात देशभरातील सुवर्णकारांनी संप पुकारला होता. हा संप ४१ दिवस सुरूच होता. सरकारतर्फे आश्वासन मिळाल्यानंतर हा संप १३ एप्रिल रोजी तात्पुरता मागे घेण्यात आला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आश्वासन दिले आहे की, त्यांच्या दुकानावर अधिकारी येणार नाहीत. त्या व्यतिरिक्त हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. ३० एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा इशारा असोसिएशनने दिला आहे. सराफांच्या संपामुळे १ लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती बुलियन, ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव योगेश सिंघल यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ४१ दिवस झालेल्या या संपामुळे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. या संपामुळे व्यापाराचे मोठे नुकसान झाले असून कारागिरांना सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
३० हजार कोटींचे उद्योग क्षेत्र : ज्वेलरी उद्योग दर वर्षी सरकारला ३०,००० कोटी रुपयांचा कर देते. हे क्षेत्र सुमारे ३.१५ लाख कोटी रुपयांचे आहे. या क्षेत्राची जीडीपीमधील भागीदारी ३.५ टक्के आहे.