आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी घटल्यामुळे सोने-चांदीत घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय बाजारातील मागणीत घट झाल्यामुळे देशातील सोने तसेच चांदीवर दबाव दिसून आला. मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान सोने १२५ रुपयांच्या घसरणीसह ३१०५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहे.

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी झालेल्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत किरकोळ रिकव्हरी नोंदवण्यात आली होती. असे असले तरी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. सिंगापूर बाजारात सोन्याचे दर ०.१४ टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत सुधार दिसून आला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोन्याच्या बाबतीत गुंतवणूकदारांची धारणा स्पष्ट होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

साेन्यासह चांदीच्या किमतीतही मंगळवारी नवी दिल्ली सराफा बाजारात झालेल्या व्यवहारात घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीचे दर १०० रुपयांच्या घसरणीसह ४५,२०० रुपये किलोच्या पातळीवर पोहोचले आहेत. औद्योगिक मागणीत घसरण झाल्यामुळेच चांदीच्या किमतीत घट झाली असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...