आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन यांच्‍यानंतर RBI गव्हर्नर कोण ? केळकर, अरुंधतींसह 7 नावांची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रघुनाथ राजन - Divya Marathi
रघुनाथ राजन
मुंबई/नवी दिल्ली- दुसऱ्या कार्यकाळाबाबतची चर्चा सातत्याने होत असलेले राजकीय हल्ले यामुळे व्यथित रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी अचानक दुसरा कार्यकाळ स्वीकारण्यास नकार देत अध्यापन क्षेत्रात परतण्याची घोषणा केली. त्‍यामुळे राजन यांच्‍या नंतर या पदावर कुणाची वर्णी लागेल, याची चर्चा जोरात सुरू आहे. अरुंधती भट्टाचार्य, विजय केळकर यांच्‍यांसह 7 जणांपैकी एकाची या पदावर वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
या दोघांच्‍या नावांची अधिक चर्चा...
> या पदासाठी विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिडी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात जणांपैकी एकाची या पदावर वर्णी लागू शकते.
> या सात जणांपैकी डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल आणि एसबीआयच्‍या प्रमुख अरुंधती हे दोघे प्रमुख दावेदार आहेत.
> या शिवाय अर्थ मंत्रालयाचे शक्तिकांत दास आणि अरविंद सुब्रमण्यम या दोन अधिकाऱ्यांची या पदावर वर्णी लागू शकते.
काय म्‍हणाले राहुल गांधी ?
> राहुल यांनी ट्वीट म्‍हटले, " पंतप्रधान मोदी यांना सर्वच क्षेत्राचे ज्ञान आहे. राजनसारख्‍या तज्‍ज्ञांची त्‍यांना गरज नाही."
> दुसऱ्या एका ट्वीटमध्‍ये राहुल यांनी लिहिले, " राजन, तुम्‍ही कठीण काळात देशाची अर्थव्‍यवस्‍था सांभाळल्‍याबद्दल तुमचे आभार !''
> दरम्‍यान, राजन या पदावर राहणार नाहीत हे देशाचे मोठे नुकसान असल्याची टीका उद्योग जगत विरोधी पक्षाने केली.
राजन यांनी काय म्‍हटले ?
गरज भासल्यास आपल्या देशाच्या सेवेसाठी मी सदैव उपलब्ध राहीन, असे राजन यांनी म्हटले आहे. योग्य विचार सरकारशी विचारविमर्श केल्यानंतर सप्टेंबर 2016 रोजी गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी शैक्षणिक क्षेत्रात परत जाणार आहे, हे मी आपल्याला कळवू इच्छितो, असे त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहेत राजन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...