आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'वाय-फाय\'पेक्षा \'लाय-फाय\'चा वेग 100 पट अधिक, एका सेकंदात फिल्म डाउनलोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताल्लिन (एस्टोनिया) - तुम्‍ही बटन दाबवले आणि तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड झाला तर ? होय, आता हे शक्‍य आहे. कारणा आता 'वाय फाय'ची जागा लाय-फाय हे तंत्रज्ञान घेणार असून, या वेग वाय-वायपेक्षा 100 पट अधिक आहे. या माध्‍यमातून 1 जीबी डाटा ट्रान्‍समीट करण्‍यासाठी अवघा एक सेकंद वेळ लागतो. प्रयोगिक तत्‍वावर लाय-फायची गती दिसून आली असून, त्‍याचा हेतू साध्‍य झाला आहे.
काय आहे लाय-फाय
- या तंत्राचे नाव लाय -फाय (लाइट फिडॅलिटी) आहे.
- या तंत्राच्या कक्षेत येणा-या प्रत्येक गॅजेटवर इंटरनेट अ‍ॅक्सेस देणे शक्य आहे.
- हे वाय-फाय पेक्षा खूप सुरक्षित आहे कारणा त्‍याची रेंज भिंतीच्‍या पलीकडे जाऊ शकत नाही.
- मोठ्या कार्यालयांसाठी माहितीचे वहन करणे सोपे होईल.
- वाय -फायला सक्षम पर्याय म्हणून लाय-फाय आहे.
- त्याचा वेगही जबरदस्त आहे. एलईडीद्वारे डेटा वहन करण्यात येईल.
- डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही

सीईओ काय म्‍हणाले ?
> वेल्मेनी कंपनीचे सीईओ दीपक सोळंकी म्‍हणाले, आता याचा पर्याय शोधणे कुणालाही शक्‍य होणार नाही. प्रकाशाच्या वेगामुळे याचा वेगही वायर्ड वाय -फायपेक्षा जास्त आहे. डेटा ट्रान्सफरिंगचे माध्यमच लाइट असल्याने सिग्नल्स हॅक करण्याचा धोका यात नाही. रुग्णालयांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नल्समध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चिक नसून 100 पटीने अधिक गतीशील आहे.
> अॅडिनबर्ग यूनिव्‍हवर्सिटीचे शास्‍त्रज्ञ हेराल्ड हास यांच्‍या टीमने एका कंपनीच्‍या मदतीने प्लग अँड प्ले अॅप्लीकेशन लॉन्च केले आहे.
> फ्रान्‍ची ओलेडकॉमने लाय-फाय टेक्नीक हॉस्पिटल्समध्‍ये लावणे सुरू केले आहे.