आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‌विदर्भासह मराठवाड्यामधील शेतकऱ्यांची हळदीला पसंती, कापूस-उसाच्या बेभरवशाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना हळदीने दिली खात्रीची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळाचे सतत सावट, कमी पावसाचे संकट अाणि कापूस-ऊस यासारख्या रोख पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल खात्रीचा अभाव यावर तोडगा म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरी आता हळदी पीक घेण्याकडे वळू लागले आहेत. पर्यायी उत्पन्नाच्या या खात्रीमुळे आता शेतकऱ्यांना हळदीचा आधार लाभला आहे. 
 
हळद म्हणजे सांगली जिल्ह्याचे आजवरचे खास वैशिष्ट्य; पण अाता ही हळद विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी स्वीकारली असून  यंदा विदर्भ- मराठवाड्यात हळदीचे बंपर पीक अपेक्षित अाहे. या नगदी पिकाने दोन्ही भागांचे अर्थकारण बदलले अाहे. महाराष्ट्रात सरासरी साडेसात ते अाठ हजार क्षेत्रफळ हळद लागवडीखाली अाहे. या वर्षी हवामान अनुकूल असल्याने हळद लागवडीखालील क्षेत्रफळात २० हजार हेक्टरने वाढ झाली अाहे.  

कापूस, ऊस यासारख्या पारंपरिक नगदी िपकांशी तुलना करता  कमी पाण्यात हळदीच्या  उत्पादनातून मिळणारा परतावा जास्त अाहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने शेतकऱ्यांनी  हा पर्याय स्वीकारला आहे.  मराठवाडा, विदर्भात जमीनधारणा जास्त असल्याने येथील शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे जास्त कल अाहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात मात्र जमीनधारणा एक ते दाेन एकर असल्याने जास्त उत्पन्न मिळत नाही.    

उत्पन्नाचा पर्यायी मार्ग  
गेल्या तीन-चार वर्षांत कापसाच्या किमतीत चढ-उतार झाल्याने चांगला परतावा मिळाला नाही. त्यामुळे पर्यायी पिकांच्या शाेेधात असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीचा पर्याय स्वीकारल्याचे  सांगली जिल्ह्यातील िडग्रस येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभाग अधिकारी डाॅ. जितेंद्र कदम यांनी सांगितले. खान्देश अाणि विदर्भातही हळदीचे उत्पादन वाढले असून ते जवळपास तीन लाख पाेत्यांवर गेले अाहे. शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध यवतमाळ, अमरावती तसेच धुळे, गोंदिया, नागपूर भागात हळदीचे प्रस्थ वाढले अाहे. त्याच्यासाेबत  अाैरंगाबाद, आळंदी, शिर्डी, जळगाव, अकाेला अमरावती या भागातही हळद लागवडीचे क्षेत्रफळ वाढले अाहे.
  
दर ८ हजार रुपयांवर   
हळदीचा भाव मागील वर्षात प्रतिक्विंटल कमाल १२ ते १३ हजार रुपये अाणि किमान ८ ते १० हजार रुपये हाेता. या वर्षी एप्रिलपासून हा भाव कमाल प्रति क्विंटल  १० हजार रुपये, तर किमान ६ हजार रुपये प्रति क्विंटल  अाहे. २०११ मध्ये हा भाव कमाल २१ हजार रुपयांवर गेला हाेता. २०१२ वर्षात हा भाव प्रति क्विंटल  ६ ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान रेंगाळला अाणि २०१४-१५ वर्षात ताे पुन्हा वाढून ८ हजार रुपयांवर गेला.
    
२०११ वर्षाने दिली कलाटणी   
याअगोदर हळद लागवड ही सांगली, सातारा, नांदेड, हिंगोली,  गाेंदिया अाणि गडचिरोली या काही ठरावीक विभागातच केली जात हाेती. परंतु २०११ मध्ये हळदीचा भाव प्रति क्विंटल २१ हजार रुपयांवर गेल्याने मराठवाडा विभागातील हळद लागवडीच्या अर्थकारणाला कलाटणी मिळाली. अवघ्या अाठ महिन्यांत अाठ लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू लागल्याने लागवडीत वाढ झाली. त्यानंतर जळगाव, रावेर, शिरपूर, जालना, बुलडाणा, मेहकर, अमरावती, अकाेला, वाशीम, िरसाेड या भागात हळद लागवड फोफावली. हळद लागवडीखालील क्षेत्रफळात अचानक वाढ झाल्यामुळे  २०१२ मध्ये पुन्हा किमती पडल्या. मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी स्थिती निर्माण झाली, असे डाॅ. कदम यांनी सांगितले.
  
यंदा १० लाख पाेती उत्पादन   
सांगली ही हळदीची मुख्य बाजारपेठ असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातही हळदीचे उत्पादन हाेत अाहे. सांगलीमध्ये हळदीचे सात लाख पाेती, तर पूर्वी मराठवाड्यात तीन लाख पाेती उत्पादन हाेते. मात्र, अलीकडच्या सहा वर्षांत मराठवाड्यात सहा लाख पाेती उत्पादन हाेत आहे. यंदा  उत्पादनात वाढ होवून ते १० लाख पाेत्यांवर जाण्याचा अंदाज सांगलीतील प्रसिद्ध हळद व्यापारी मनाेहर सारडा यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांचा फायदा असा   
हळदीच्या उत्पादनाला प्रति क्विंटल ७ ते ८ हजार सरासरी भाव मिळाला तरी शेतकऱ्याला एकरी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.  विदर्भ, मराठवाड्यात जमीनधारणा जास्त असल्याने शेतकरी चार ते पाच एकरांत हे पीक घेताे. वर्षाला चार ते पाच लाख रुपये मिळतात. हळद लागवडीमध्ये पहिल्या वर्षात जास्त एकरी दीड लाख रुपये खर्च येताेे. दुसऱ्या वर्षापासून शेतकरी स्वत:चे बियाणे वापरू शकतो.  त्याचा खर्च जवळपास ५० टक्क्यांनी कमी हाेत असल्याने त्याचाही फायदा शेतकऱ्यांना िमळताे.
बातम्या आणखी आहेत...