आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तेव्हा सर्व म्हणत होते- मार्क, फेसबुक विक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोस- फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचे नाव सर्वांनाच परिचित. पण मार्क अँड्रिसन हे तितकेच अपरिचित. याच अँड्रिसननी २००६ मध्ये याहू-फेसबुकमध्ये होणारा चार हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार झुकेरबर्गला मोडायला भाग पाडले होते. त्यांनी "द न्यूयॉर्कर'ला दिलेल्या मुलाखतीत तो प्रसंग सांगितला, जेव्हा प्रत्येक जण म्हणत होता - ‘झुकेरबर्ग, फेसबुक विकून टाक.’ वाचा त्याची कहाणी त्यांच्याच शब्दांत...
मी झुकेरबर्गला म्हणालो, अब्जाे डॉलरही देणार नाहीत अशी ओळख फेसबुक तुला देईल
ही गोष्ट आहे जुलै २००६ ची, तेव्हा फेसबुक दोनच वर्षांचे व अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट बनले होते. आम्ही त्याचे क्रमांक दोनचे गुंतवणूकदार होतो. अचानक कळले की, याहू ही फेसबुकला ४,४२७ कोटींत खरेदी करू पाहत आहे. फेसबुकच्या ऑफिसमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले. कंपनीचे नंबर वन गुंतवणूकदार एस्सेल पार्टनर्स हेही आनंदित होते. मात्र, झुकेरबर्ग संभ्रमात होता. खरे तर २२ वर्षांच्या तरुणासाठी ही मोठी संधी होती. कंपनीचे वय इनमिन दोन वर्षे अन् याहूसारख्या आयटी कंपनीकडून आलेली इतकी मोठी ऑफर. पण, मला वाटत होते की, ही डील मोठ्या यशाचा प्रवास येथेच संपवेल. मी झुकेरबर्गला भेटलो. तो काहीही ठरवण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तेव्हा फेसबुकमध्ये प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होते, "विकून टाका-विकून टाका, संधी चांगली आहे. मात्र, मी त्याला म्हणालो, विकू नको, कारण तू जेथपर्यंत फेसबुकला नेऊ शकतो, व जेथपर्यंत फेसबुक जाऊ शकते, अशी ओळख अब्जावधी डॉलरही मिळवून देणार नाहीत. यावर त्याने संमतिदर्शक डोके हलवले. मात्र, कार्यालयात पुन्हा "विकून टाका-विकून टाका’चा धोशा सुरू झाला. पण मी व झुकेरबर्ग खुश नव्हतो. हा मुद्दा आम्ही कार्यालयच नव्हे तर सागरकिनाऱ्यावर फिरत असतानाही चर्चिला होता. यादरम्यान आमचे नाते "गुंतवणूकदार-ग्राहक'ऐवजी मित्राचे झाले होते. शेवटी झुकेरबर्गने याहूला नकार दिला. तेव्हा एक अब्ज डॉलरमध्ये विकली जाणारी कंपनी आज २०० अब्ज डॉलर्सपेक्षा मोठी झाली आहे.