आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Zuckerberg Buys Domain Name From Engineering Student In Kochi

मार्क झुकरबर्गने या भारतीय इंजिनियर विद्यार्थ्याकडून खरेदी केले डोमेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमल अगस्टाइन - Divya Marathi
अमल अगस्टाइन
कोची- 'फेसबुक'चा संस्थापक मार्क झुकरबर्गने एका भारतीय इंजिनियर विद्यार्थ्याकडून एक डोमेन खरेदी केले आहे. यासाठी झुकरबर्गने मोठी किंमतही मोजल्याची माहिती मिळाली आहे.
अमल अगस्टाइन असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

डोमेन खरेदी करण्यासाठी फेसबुक सारख्या मोठ्या कंपनीने आपला शोध घेतल्याचे अप्रुप वाटत असल्याचे अमलने म्हटले आहे. फेसबुकने 46 हजार रुपयांमध्ये अमलकडून डोमेन खरेदी केले.

काय खास आहे या डोमेनमध्ये?
- अमल अगस्टाइन हा कोचीतील केएमईए इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. तो अंतिम वर्षाला आहे.
- 'फेसबुक'ने maxchanzuckerberg.org नामक डोमेन खरेदी करण्‍यासाठी स्वत: अमलशी संपर्क साधला.
- तुम्हाला माहीत असेलच, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मार्कला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रिसिला चान व मार्कने आपल्या कन्येचे नाव 'मॅक्स चान' ठेवले आहे.
- अमलने डिसेंबर 2015 मध्ये झुकरबर्गच्या मुलीच्या नावाशी मिळते जुळते maxchanzuckerberg.org डोमेनची नोंदणी केली होती.
- 'फेसबुक'ला ही माहिती मिळाली. झुकरबर्गने अमलशी संपर्क करून 700 डॉलर अर्थात 46,655 रुपयांत हे डोमेन खरेदी केले.

पुढील स्लाइडवर वाचा, फेसबुकने कसा केला अमल अगस्टाइनशी संपर्क...