आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Zuckerbergs Wife Priscilla Chan Expecting 1st Baby

मार्क झुकेरबर्गच्या घरी येणार कन्यारत्न, पत्नीचा तिनदा झाला होता गर्भपात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. झुकेरबर्ग यांनी स्वत: ही गुडन्यूज काही महिन्यांपूर्वी दिली होती. आता झुकेरबर्ग दोन महिन्यांच्या पॅटरनिटी लीव्हवर जाणार आहेत. झुकेरबर्ग पहिल्यांदा वडील होत आहे. त्याच्या घरी कन्यारत्न (मुलगी) येणार आहे. झुकरबर्ग यांच्यावर लाइक्स आणि शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे.

झुकेरबर्गने असा केला होता आनंद शेअर..
'माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक गुड न्यूज आहे. आमच्या घरी नवा पाहुणा येत आहे. आता आमच्या आयुष्याचे नवे चॅप्टर सुरु होईल. आम्ही खूप भाग्यशाली आहे. पत्नी प्रशिला लवकरच एका मुलीला जन्म देणार आहे. मी बाप बनणार आहे. आमचे अनुभव तुम्हाला वाटू इच्छीतो'. असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अपत्याच्या प्रतिक्षेत आहोत. प्रशिलाचा यापूर्वी तिनदा गर्भपात झाला होता. परमेश्वर पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मैत्रिणीसोबत 2012 मध्ये केला विवाह...