आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये बाजाराची झाली निराशा; सेन्सेक्स 194, तर निफ्टीत 64 अंकांची घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय शेअर बाजारातील संवत २०७४ ची सुरुवात घसरणीसह झाली. दिवाळीच्या विशेष ट्रेडिंगमध्ये मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १९४ अंकांच्या घसरणीसह ३२३८९.९६ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ६४ अंकांच्या घसरणीसह १०१४७ या पातळीवर बंद झाला. सायंकाळी ६.३० ते ७.३० या एका तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक घसरण खासगी क्षेत्रातील बँकिंग शेअरमध्ये नोंदवण्यात आली. 

गुरुवारी युरोपातील राजकीय घडामोडींमुळे युरोपीय शेअर बाजारात अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरण झाली, तर आशियाई बाजारातही दबाव दिसून आला. 

सोन्याला झळाळी
दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली कमोडिटी बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग सोन्यासाठी शुभ राहिली. सोने ०.३४ टक्क्यांच्या वाढीसह २९६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. तर चांदी ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह ३९,८३५ रुपये प्रतिकिलोग्रॅमवर बंद झाली.
बातम्या आणखी आहेत...