आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ, सेन्सेक्स २६,००० वर बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ९१ अंकांच्या वाढीसह २६०५१ च्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह ८०३३ च्या पातळीवर बंद झाला. नोटबंदीमुळे नीचांकी पातळीवर गेलेल्या दोन्ही निर्देशांकांत सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी किरकोळ वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या व्यवहारामध्ये छोट्या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी नोंदवण्यात आली अाहे. मेटल फार्मा तसेच रिअॅल्टी स्टॉक्समध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.
मोठ्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे बाजारावर अनिश्चिततेचा प्रभाव असल्याचे मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डिसेंबर महिन्यात जागतिक बाजारात घसरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत अनिश्चितता पाहता मोजक्या स्टॉक्समध्ये खरेदी नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...