आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारूती सुझुकी देत आहे पैसे कमावण्‍याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मारूती सुझुकी लिमिटेड' ची नवी नेक्‍सा कार - Divya Marathi
'मारूती सुझुकी लिमिटेड' ची नवी नेक्‍सा कार
देशातील सगळयात मोठी कार उत्‍पादक कंपनी 'मारूती सुझुकी लिमिटेड' बिझनेस करण्‍याची इच्‍छा असणा-यांना या वर्षी संधी देत आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2015-16 साठी प्रिमीअर कारसाठी डिलरशिप देत आहे. यासाठी कंपनी एकूण 100 'नेक्‍सा' स्‍टोर सुरू करणार आहे. यासाठी कंपनीला डिलरची आवश्‍यकता आहे. कंपनीने डिलरशिपची संधी पहिल्‍यांदाच दिली असुन इच्‍छुकांसाठी मारूतीसोबत डिलरशिप करून व्‍यवसाय करण्‍याची संधी चालून आली आहे.
काय आहे कंपनीची योजना
'मारूती सुझुकी लिमिटेड' प्रिमिअर सेगमेट बाजारात आपले वर्चस्‍व निर्माण करण्‍यासाठी प्रिमिअर कारसाठी एक्‍सक्‍लूटिव्‍ह डिलर नेटवर्क तयार करत आहे. मारूती सुझुकीचे कार्यकारी संचालक आर. एस. कल्‍सी यांनी मनी भास्‍करला सांगितले की, कंपनी ऑगस्‍टमध्‍ये आगामी नवी कार क्रॉसओव्‍हर कार 'एस-क्रॉस'ला नेक्‍स्‍टा रिटेल आउटमध्ये लॉन्‍च करणार आहे. यासाठी कंपनी आर्थिक वर्ष 2015-16 मध्‍ये देशातील 30 शहरांमध्‍ये 100 नेक्‍सा आउटलेट सुरू करत असल्‍याचे कल्‍सी यांनी सांगितले.

फायदेशिर असेल नेक्‍सा
नेक्‍सा रिटेल आउटलेट भारतीय कार इंडस्‍ट्रीमध्‍ये फायदेशिर राहणार आहे. ग्राहकांना आता डिजिटल अनुभव मिळणार आहे. कारण कंपनीत आता सर्वसाधारण सेल्‍समन नसणार. त्‍या जागेवर कंपनी आता रिलेशनशिप ऑफिसरची नियुक्‍ती करीत आहे. कंपनी हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशनसह दुस-या सेक्‍टरमधुन जवळपास 700 रिलेशनशिप मॅनेजर नियुक्‍ती करणार आहे. रिलेशनशिप मॅनेजरची नियुक्‍ती डिलरव्‍दारे करणार असल्‍याचे कल्‍सी यांनी सांगितले.
डिलरसाठी निवेदन करण्‍याची पद्धत
'मारूती सुझुकी लिमिटेड'ची डिलरशिप मिळविण्‍यासाठी कंपनीच्‍या ई-मेल अथवा रजिस्‍टर्ड पत्‍यावर संपर्क साधावा. इच्‍छूकांना निवेदन करतांना एक निवेदन फॉर्म भरून द्यावा लागेल. त्‍यावर डिलरशिप ज्‍या शहरात पाहिजे त्‍या शहराच्‍या नावासोबत अॅसेट्सविषयीही माहिती द्यावी. माहितीच्‍या आधारावर कंपनी निवेदनावर निर्णय घेणार आहे.
'मारूती सुझुकी लिमिटेड'चे स्‍टोर पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईट वर क्लिक करा
बातम्या आणखी आहेत...