आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन उद्योगात मारुती सुझुकी अव्वलस्थानी विराजमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विक्रीच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योग समूहाला मागे टाकत मारुती सुझुकी इंडियाने १.२६ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारासह पहिला क्रमांक मिळवला आहे, तर १.१४ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारासोबत टाटा मोटार्स दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला, तेव्हा मारुती सुझुकीचा मार्केट कॅप १,२६,६९३.८९ कोटी रुपये, तर टाटा मोटार्सचा मार्केट कॅप १,१४,६२२.४२ कोटी रुपये होता. मारुती सुझुकी २००३ मध्ये शेअर बाजाराच्या लिस्टवर आली होती. टाटा मोटार्स मात्र १९९१ पासून शेअर बाजारात लिस्टवर आहे. टाटा मोटार्स समूहाची जग्वॉर लँड रोव्हरची (जेएलआय) चीनच्या बाजारात विक्री घटली आहे. चीनमध्ये सध्या इम्पोर्टेड गाड्या वापरणारे ग्राहक कमी होत आहेत. त्यामुळे तेथील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे. २७ जानेवारीपासून आतापर्यंत टाटा मोटार्सचे शेअर्स ५९८.६९ रुपयांवरून ३३.४० टक्के घटून ३९८.७५ रुपयांच्या पातळीवर आले आहते. यामुळे गुंतवणूकदारांचे ७०,०८१.६८ कोटी रुपये बुडाले आहेत.

दुसरीकडे, मारुती सुझुकीचे शेअर्स ३,६८५.२० रुपयांवरून १३.८१ टक्क्यांच्या वाढीसह ४,१९४.०५ रुपयांवर पोहोचले आहेत. या वाढीमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना जवळपास १४,८५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये ३.७७ टक्क्यांची पडझड झाली आहे, तिथेच बीएसई ऑटो इंडेक्स ७.३७ टक्के खाली आला आहे.