आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सेल जीवनगाैरव पुरस्कार बारवाले यांना जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले उद्याेजक तसेच काॅर्पाेरेट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या बिझनेस नेतृत्वाची दखल घेऊन त्यांचा यथाेचित गाैरव करणारे मॅक्सेल पुरस्कार जाहीर झाले अाहेत. यंदाच्या वर्षात महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष बद्रीनारायण बारवाले यांना मॅक्सेल जीवन गाैरव पुरस्कार देण्यात येणार अाहे. या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील सहा
उद्याेजकांची निवड झाली अाहे. मराठवाडा अाॅटाे क्लस्टरच्या अनाेख्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना मॅक्सेल विशेष पुरस्कार देऊन गाैरव करण्यात येणार अाहे. हा पुरस्कार वितरण साेहळा शनिवार ७ मे राेजी वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात हाेणार अाहे. कृषी-औद्योगिक क्षेत्रात मूलभूत काम करणारे प्रख्यात उद्योजक बद्रीनारायण बारवाले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला अाहे. भरपूर उत्पादन देणारी बियाणे उपलब्ध करून देऊन त्यांनी क्रांती घडवून आणली.
बातम्या आणखी आहेत...