आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकडोनाल्ड्स वाद: विक्रम बक्षींना लवादाकडून दिलासा नाही; 169 आउटलेट बंद करण्याची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -मॅकडोनाल्ड्ससोबतच्या वादात विक्रम बक्षी यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलेट लवादाकडून दिलासा मिळालेला नाही. यामुळे आता त्यांच्यावर १६९ आउटलेट बंद करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) मंगळवारी या स्टोअरच्या फ्रँचायझींसंबंधी अधिकाराची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी बुधवारी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर वरिष्ठ लवादाने ही स्थगिती देण्यास नकार दिला. असे असले तरी सर्व कागदपत्रे योग्य असल्यास या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी करण्यास लवादाने सहमती दिली आहे.उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये १६९ स्टोअर कॅनॉट प्लाझा रेस्तराँ (सीपीआरएल) कंपनीचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...