आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी रायटर ते \'इंटरनेट सेलिब्रिटी\', वाचा 4G गर्लची Success Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मोबाइल नेटवर्क कंपनीची 4G जाहिरात सध्या चर्चेत आहे. जाहिरातील दिसणारी मॉडेल साशा छेत्री ही एक कॉपी रायटर होती. परंतु या जाहिरातीने साशा इंटरनेटची नवी सेलिब्रिटी बनली आहे. 4G गर्ल म्हणून इंटरनेटवर साशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. जाहिरातील दिसणारी साशा सर्वात फास्ट इंटरनेटचा चॅलेंज घेऊन समोर येते. या एका जाहिरातीने साशाचे आयुष्यच बदलून गेले आहे.

कोण आहे ही तरुणी?
अल्पावधीत 4G गर्ल सेलिब्रिटीच्या रुपात देशासमोर आलेल्या तरुणीचे नाव साशा छेत्री आहे. ती उत्तराखंडमधील डेहराडून येथील आहे. 19 वर्षाय साशाने मुंबईतील जेव्हेयर इनिस्टट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून जाहिरात विषयात पदवी घेतली आहे. ती एक म्यूझिक आर्टिस्ट देखील आहे. परंतु, तिला अॅक्टिंग व मॉडेलिंगचा कोणताही अनुभव नाही. टेलीकॉमची ही जाहिरात 54406 वेळा टीव्हीवर दाखवण्यात आली होती. मागील दोन महिन्यात साशा टिव्हीवर 475 तास दिसली आहे. इंटरनेटवर देखील या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

साशाला अशी मिळाली एअरटेलची जाहिरात
साशाने माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंगकडे आकर्षित झाली. साशाने प्रोफाइल व फोटो काही जाहिरात एजन्सीच्या साइटवर अपलोड केले. त्या काळात एअरटेल कंपनी 4G च्या जाहिरातीसाठी नवा चेहरा शोधत होती. कंपनीला साशाचा प्रोफाइल भावला आणि तिला मुंबईत आमंत्रित केले. एअरटेल 4Gच्या जाहिरातीसाठी तिची निवड केली. पाहाता पाहाता ही जाहिरात सुपरहिट ठरली. जाहिरातीलने कंपनीला मोठा फायदा झाला.

साशा नेपाळी असल्याचे बहुतेकजण म्हणतात. बीबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साशाला आता मॉडेलिंगमध्ये करियर घडवायचे आहे. सिनेमांमध्येही काम करण्‍याची तिची मनीषा आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 4G गर्लच्या रुपात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या साशा छेत्रीचे इतर फोटोज...